मुंबईत दोन दिवसांपूर्वी मढ येथे दुर्मिळ लॉगरहेड कासवाचे दर्शन झाले होते. किनारपट्टीवर अचानक आलेल्या या कासवाला स्थानिक मच्छिमारांनी वनाधिका-यांना दिले. उपचारादरम्यान या मादी कासवाला न्यूमोनियाचे निदान झाले आहे. मुंबईतील समुद्रकिना-याजवळ पहिल्यांदाच हा दुर्मिळ कासव आल्याचा दावा सागरीजीवशास्त्रज्ञ अभ्यासकांनी केला आहे.
( हेही वाचा : राज्यात बीए व्हेरियंटचे रूग्ण वाढले)
दुर्मिळ कासवाला न्यूमोनिया
ऐरोलीतील ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील सागरी वन्यप्राणी उपचार केंद्रात कासवावर उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्यातच दिवेआगार येथे लॉगरहेड कासव समुद्रकिना-यावर आढळले होते. या भागांतही पहिल्यांदाच हा कासव आढळून आला होता. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचर या संस्थेने या कासवाला जगभरातून संकटग्रस्त झाल्याचे जाहीर केले आहे. हे कासव खोल समुद्रात आढळते. याआधी महाराष्ट्रातील किनारपट्टीला लागून असलेल्या खोल समुद्रात हे कासव मच्छिमारांच्या जाळ्यात अडकले होते. त्यावेळी कासवाला सुखरूप पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. हे कासव किनारपट्टीला आढळत नाही. कासव किंवा एखादा सागरी जीव किनारपट्टीला आढळून येण्यामागे प्राण्याच्या तब्येतीबाबत शंका घेतली जाते, मढ येथे किनारपट्टीवरुन आढळलेली मादी लॉगरहेड कासवाच्या पाठीवर जखमाही आढळून आल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळेल्या आतापर्यंतच्या पाच कासवांपैकी मढ येथील कासवाचा आकार सर्वात जास्त मोठा असल्याचे निरीक्षण सागरीजीव अभ्यासकांनी नोंदवले आहे. मादी लॉगरहेड कासवाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येण्यात फार वेळ लागेल. पशुवैद्यकीय अधिकारी कासवावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही कांदळवन कक्षाकडून दिली गेली.
Join Our WhatsApp Community