ट्रेनच्या तिकीटावरील गाडी नंबरमध्ये दडलंय मोठं रहस्य, लिंकवर क्लिक करुन वाचा

223

जेव्हा आपण बाहेरगावी जाणा-या ट्रेनचं तिकीट आरक्षित करतो, तेव्हा त्यावर ट्रेनच्या नावासोबतच ट्रेनचा नंबर सुद्धा छापलेला असतो. हा पाच आकडी नंबर म्हणजे फक्त तिकीटाची जागा भरण्यासाठी किंवी आपली आकड्यांची उजळणी करण्यासाठी देत नाहीत. हे आकडे आपल्याला त्या ट्रेनची संपूर्ण कुंडली सांगतात. ट्रेनचा प्रकार, ट्रेन जिथून प्रवास करणार आहे त्याचे झोन्स अशी सगळी माहिती या आकड्यांमध्ये दडलेली असते. मग ती ओळखायची कशी? शेवटपर्यंत वाचा मग कळेल.

  • 0- जर गाडीचा नंबर 0 पासून सुरू होत असेल,तर याचा अर्थ ती विशेष ट्रेन आहे.(म्हणजेच, सुट्ट्यांसाठी किंवा गणपतीसाठी सोडण्यात येणा-या विशेष गाड्या)
  • 1 आणि 2- ज्या गाड्यांचा नंबर 1 आणि 2 ने सुरू होतो त्या ट्रेन लांबच्या प्रवासाला जाणा-या असतात. राजधानी, शताब्दी,दुरान्तो यांसारख्या सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा नंबर हा 1 किंवा 2 ने सुरू होतो.
  • 3- 3 ने सुरू होणारा गाडी नंबर हा कोलकाता उपनगरीय गाड्यांना देण्यात येतो.
  • 4- या आकड्याने सुरू होणा-या गाड्या दिल्ली,चेन्नई आणि इतर उपनगरीय शहरांतून प्रवास करतात.
  • 5- 5 ने सुरू होणा-या गाड्या या पॅसेंजर ट्रेन असतात.
  • 6- या आकड्याने सुरू होणा-या गाड्या या MEMU ट्रेन असतात.
  • 7- ज्या गाड्यांचा नंबर 7 ने सुरू होतो त्या DEMU गाड्या असतात.
  • 8 आणि 9- ज्या गाड्यांचा नंबर 8 ने सुरू होतो त्या आरक्षित गाड्या,तर 9 ने सूरू होणा-या गाड्या या मुंबई उपनगरातून जाणा-या गाड्या असतात.

(हेही वाचा EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)

आता गाडी नंबरमध्ये असलेल्या दुस-या आणि तिस-या आकड्यांवरुन ट्रेनचा झोन आणि विभाग समजतो. हे झोन आपल्याला पुढीलप्रमाणे ओळखता येतात-

  • 0- कोकण रेल्वे
  • 1- मध्य रेल्वे,मध्य-पूर्व रेल्वे,उत्तर-पूर्व रेल्वे
  • 2- ज्या गाड्यांच्या नंबरमध्ये दुसरा नंबर 2 असतो त्या सुपरफास्ट ट्रेन्स असतात, या गाड्यांच्या तिस-या नंबरवरुन आपल्याला झोन समजतो.
  • 3- पूर्व रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे
  • 4-उत्तर रेल्वे,उत्तर मध्य रेल्वे आणि पूर्व-पश्चिम रेल्वे
  • 5-उत्तर मध्य रेल्वे आणि उत्तर पूर्व फ्रंटियर रेल्वे
  • 6-दक्षिण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे
  • 7-दक्षिण पूर्व रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे
  • 8-दक्षिण पूर्व रेल्वे आणि पूर्व किनारी रेल्वे
  • 9-पश्चिम रेल्वे,उत्तर पश्चिम रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे

(हेही वाचाः आठवड्यातून रविवार येतील ना हो तिनदा, ऑफिसच्या सुट्ट्यांबाबत केंद्र सरकार नवे कायदे लागू करण्याच्या तयारीत)

उदा. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्लीला जाणा-या राजधानी एक्सप्रेसचा क्रमांक 12951 आहे. म्हणजेच पहिल्या 1 आणि 2 आकड्यांवरुन आपल्याला ती लांब प्रवासाला जाणारी एक्सप्रेस गाडी आहे हे कळलं त्यानंतर तिसरा आकडा 9 म्हणजेच पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणारी ती ट्रेन आहे हे आपल्याला कळलं.

गाडी नंबरमधील 4 आणि 5 क्रमांक हा त्या गाड्यांच्या सिरियल नंबरसाठी असतो. हे सिरीयल नंबर लागोपाठचे असतात ज्यामुळे गाडी अप आहे की डाऊन हे लगेच कळतं.

उदा. मुंबई ते पुणे डेक्कन एक्सप्रेसचा डाऊन गाडी नंबर 11007 आहे, तर याच ट्रेनचा पुणे ते मुंबई अप नंबर 11008 आहे.

त्यामुळे गाडी नंबर वरुन सुद्धा आपल्याला गाडीचं अंतिम स्थानक आणि प्रकार ओळखणं सोपं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.