राज्यातील गड – किल्ल्यांचे संवर्धन केले जाईल, अशी घोषणा करणारे ठाकरे सरकार प्रत्यक्ष मात्र उर्दू भवन उभारण्यात मग्न आहे, दुसरीकडे शिवकालीन पराक्रमाचे जिवंत साक्षीदार असलेले गड – किल्ले यावर मात्र मुसलमान अतिक्रमण करत आहेत, काही ठिकाणी तर हिंदूंना येण्यास प्रतिबंध केला जावू लागला आहे, तरीही ठाकरे सरकार धिम्म आहे, तसेच पुरातत्व विभागही निष्क्रिय आहे. नुकतेच रायगडावर मदार उभारण्याचा डाव शिवप्रेमींनी हाणून पाडला, त्यापाठोपाठ पुण्यातील लोहगडावर उरूस साजरा केला जाणार असल्याचे उघडकीस आणले, आता मुंबईतील कुलाबा किल्ल्यावर थेट थडगं बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे, हा असाच प्रकार सुरू राहिला तर उद्या राज्यातील सर्व गड – किल्ल्यांवर श्रीमलंग गडाप्रमाणे हिंदूंना अतिक्रमित मुसलमानांकडून प्रतिबंध केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा आता शिवडी, सरसगड, मानगड, हिराकोट गड – किल्ल्यांचे इस्लामीकरण! पुरातत्व खाते करतेय काय?)
‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावरील थडग्याच्या विरोधात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी नुकतीच मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे; मात्र या तक्रारीवर कारवाई करायची तर दूरच; पण पुरातत्व विभागाने या पत्राला साधे उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवलेले नाही.
(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)
कुलाबा गडावर असे कोण महान सत्पुरुष होऊन गेले, की त्यांची समाधी थेट गडाच्या तटबंदीवर यावी? पुरातत्वीय महत्त्वाचे गड आणि परिसर यांवर अतिक्रमण करून, त्यांवर ताबा मिळवून नवीन ‘धार्मिक जिहाद’ करत आहे. हे गड-किल्ले कुणाच्या बापाची मालमत्ता नाही, याला सर्वस्वी पुरातत्व विभाग जबाबदार आहे. काल चादर टाकली, आज थडगं उभारले उद्या उरूस साजरा केला जाणार का, हे खपवून घेतले जाणार नाही. पुरातत्व विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अन्यथा जनक्षोभ उसळेल.
– रघुजी राजे आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज
पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोरच उभारले थडगे
राज्यातील गड – किल्ल्यांवर राजरोसपणे अतिक्रमण होत असल्यामुळे आता पुरातत्व विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोहगडावर परवानगीशिवाय उरूस साजरा करण्याची तयारी सुरू असताना या विभागाने याकडे दुर्लक्ष केले, आता रायगड जिल्ह्यातील अलीबाग येथील कुलाबा किल्ल्यावर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या थडग्याकडेही कानाडोळा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गडावर असलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या जवळच सिमेंट आणि लाद्या यांचा वापर करून पक्के बांधकाम करून थडगे उभारण्यात आले आहे. त्यामुळे गड – किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी असलेला पुरातत्व विभागाच या अशा अवैध बांधकामांना पाठिंबा देत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)
आम्हाला रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने दीपोत्सव करायचा होता, पण आम्हाला परवानगी दिली नाही. पुरातत्व विभागाने आम्हाला रांगोळी काढू दिली नाही. पुरातत्व विभागाचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. गड-किल्ल्यांचे मोगलीयकरण करण्याचे कारस्थान सुरु आहे. कल्याणमधील श्रीमलंग गडावर जसे हिंदूंना फ्तरीबंध केले आहे, तसे उद्या सर्व गड- किल्ल्यांवर प्रतिबंध होईल. महाराज सर्वधर्म समभावी नव्हते, त्यांनी हिंदू स्वराज्य निर्माण केले आहे परंतु हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याची खोटे सांगण्यात आले आहे. गड-किल्ल्यांचे जे मोगलीयकरण सुरु आहे, ते हाणून पडले पाहिजे.
– सुनील पवार, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती
…तर आंदोलनाचा करणार!
गडकिल्ल्यांवर उघडपणे होत असलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणारा पुरातत्व विभाग गड अन् दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन कसे करणार? ‘प्राचीन स्मारक तथा पुरातत्वीय स्थल अवशेष नियम १९५३ मधील कलम १९ आणि नियम ८’, तसेच ‘अधिनियम १९५९ च्या नियम ९’ यांनुसार प्राचीन स्मारक किंवा त्याच्या परिसरात धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी आहे. त्यामुळे प्राचीन स्मारकांमध्ये समावेश असलेल्या शिवकालीन गडांवर पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना एक खिळाही ठोकता येत नाही. इतके कडक नियम असतांनाही राज्यातील गड अन् दुर्ग यांच्यावर थडगी, दर्गे यांची अवैधपणे पक्की बांधकामे करण्यात येत असून त्यांविरोधात अनेक तक्रारी करूनही कोणती कारवाई होतांना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या ‘कुलाबा किल्ल्या’वर ज्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनधिकृत मजार (थडगे) उभारण्यात आली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हिंदु जनजागृती समिती आणि राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शिवकालीन, शिव प्रतापाचे जिवंत साक्षी पुरावे असलेले गड – किल्ले म्हणजे अस्मिता आहे, हे राज्यकर्त्यांनी पाठ्यपुस्तकांतून शिकवले नाही, त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये पर्यटन अथवा मनोरंजन पार्ट्या करणे हाच उद्देश असतो, त्यामुळे गड – किल्ल्यांचे संवर्धन म्हणजे शिवकालीन इतिहासाची जपणूक अशी भावना असणारे फारच तुरळक आहेत, त्यामुळे या ठिकाणी येणारे तेथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतात, परिणामी छत्रपती शिवरायांच्या गडांवर थडगे बांधणे, नंतर त्यावर हिरवी चादर चढवणे, हळूहळू तेथे उरूस साजरा करून काही वर्षांनी ती जुनी परंपरा असल्याचे भासवणे आणि नंतर दर्गा उभारून ते ‘धार्मिक केंद्र’ बनवणे, हा सर्व प्रकार नियोजनबद्ध चालू आहे. यामुळे या ऐतिहासिक गडकोटांवरील छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पुसून टाकला जात आहे.
– सुनिल घनवट, हिंदू जनजागृती समिती, प्रचारक