आता शिवडी, सरसगड, मानगड, हिराकोट गड – किल्ल्यांचे इस्लामीकरण! पुरातत्व खाते करतेय काय?

राज्यातील प्रतापगड, रायगड अशा मोठ्या गडांवर मुस्लिमांचे अतिक्रमण होत आहे, तसेच राज्यातील जे छोटे किल्ले आहेत, त्यांच्यावरही थडगी बांधून, हिरवी चादर अंथरूण उरूस भरवून त्या किल्ल्यांचे इस्लामीकरण करणे सुरू आहे. यामध्ये लोहगड, कुलाबा किल्ल्याच्या पाठोपाठ आता शिवडी किल्ला, रायगड जिल्ह्यातील सरसगड, मानगड आणि अलिबाग येथील हिराकोट या किल्ल्यांचे अनेक वर्षांपूर्वीच इस्लामीकरण करण्यात आले आहे.

(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)

शिवडी किल्ल्याची ओळख पुसण्याचे कारस्थान

शिवडी येथील किल्ला १५०० शतकात बांधलेला आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सैय्यद जलाल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण १ एकर जागेत दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून येथे नवीन बांधकाम करण्यात आले आहे, मात्र याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत शिवडी किल्ला येतो. या दर्ग्याचे ठिकाण हे नवनाथांपैकी एका नाथांचे स्थान असल्याचे येथील जाणकार वृद्ध मंडळी सांगतात. त्यामुळे काही हिंदू भाविकही येथे येतात. दर्ग्याच्या देखरेखीसाठी मुसलमान कुटुंब तेथे वसवण्यात आले आहे. गडाच्या प्रवेशद्वाराबाहेरच अनेक हिरवे ध्वज लावण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर दर्ग्याच्या नावाची मोठी कमान बांधण्यात आली आहे. एकंदर शिवडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर किल्ल्याला समांतर दर्ग्याचे बांधकाम अवैधपणे वाढवून त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात आले आहे. हे सर्व बांधकाम किल्ल्याच्याच जागेत अवैधपणे चालू असून त्याकडे राज्याचे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे.

सध्या गड-किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ३०० पेक्षा अधिक संघटना करत आहेत, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे एकत्र व्यासपीठ बनवणे आणि त्यासाठी जनमत तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज कि जय असेच आपण म्हणायचे का? आज कुलाबा किल्ला, काल रायगड होता, प्रत्येक वेळी आरडाओरडा करत राहायचे का? यापुढे गड-किल्ल्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे.
– रघुजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज

(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

सरसगड, मानगड, हिराकोट गडावर थडगी उभारली

रायगड जिल्ह्यातील पाली येथील सरसगड, माणगाव येथील मानगड आणि अलिबाग येथील हिराकोट या गडांवरही अनधिकृत थडगी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरसगडावरील थडगे २०-२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून तेथे आता मुसलमान नियमित उरूस साजरा करतात. मानगडावर थडगे बांधून त्यावर चादर चढवण्यात आली आहे, तर हिराकोट येथे प्रथम थडगे बांधून आता त्याचा बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हिराकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून उपयोग करण्यात येत आहे. या गडाच्या समोरच काही अंतरावर थडगे बांधण्यात आले आहे. या थडग्यावर चादर अंथरून त्याच्या तीनही बाजूला भिंती बांधण्यात आल्या आहेत. हे अनधिकृत बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. गडाच्या दर्शनी भागात आणि रस्त्याला अडथळा होईल, अशा पद्धतीने थडगे बांधूनही त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

(हेही वाचा खऱ्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमण अन् मंत्र्याच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांच्या नावांचा देखावा!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here