सध्याच्या घडीला बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. गृहकर्ज तुम्हाला घराचे मालक बनण्याची आणि कर सवलतीचे फायदे मिळवण्याची मोठी संधी देत आहे. तुम्हाला माहित आहे का सध्यस्थितीत सर्वात स्वस्त गृहकर्ज कोणती बँक तुम्हाला देऊ शकते…वाचा सविस्तर
(हेही वाचा- …तर तुमचे पॅनकार्ड बाद होणार! आयकर विभागाने नागरिकांना दिला इशारा)
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गरजेची आणि पात्रतेची कल्पना असणे आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त कर्ज रकमेसाठी अर्ज केल्यास आणि ज्यासाठी तुम्ही पात्र नसाल तर बँक तुमचा कर्जाचा अर्ज नाकारते. बँकेची ही कृती टाळण्यासाठी तुमची कर्जाची पात्रता एकदा तपासून बघा. यामुळे तुमच्यासाठी डाऊन पेमेंटसाठी रक्कर ठरवणं सोयिस्कर ठरेल.
दरम्यान, गृहकर्ज काढताना जितका ईएमआय तुम्ही भरू शकणार आहात तितकेच कर्ज काढा. बँका साधारणपणे कर्जदाराच्या हातात येणाऱ्या पगाराच्या ४० टक्क्यांपर्यंत ईएमआयसाठी परवानगी देतात. ज्यांच्याकडे तुमची आधीपासून चांगली ओळख असेल अशा बँकांकडून कर्ज घेणे अनेकदा फायद्याचे आणि सोयिस्कर ठरते. यामुळे या बँका कर्जाची प्रक्रिया लवकर करतात. यासह त्यांच्याकडे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर आणि वैयक्तिक तपशीलांबद्दल आधीच कल्पना असेल. यामुळेच अशा प्रकरणांमध्ये कमी वेळेत कर्ज दिले जाते.