लव्ह जिहादच्या षडयंत्रात सापडलेल्या एका तरुणीची आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप सुटका केली. उत्तर प्रदेशातील मेरठहून तिला नागपुरात परत आणले सोबतच तिचे शुद्धीकरण करवून स्वधर्मात ‘घर वापसी’ केली.
धर्मांतरण करून आफिया नाव ठेवले
यासंदर्भात आविहींपचे प्रदेश मंत्री किशोर डिकोंडवार यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मेरठहून नागपुरात आलेला साबीर हा पीओपीचे काम करीत असे. इयत्ता बारावीत शिकणाऱ्या प्रितीची (बदललेले नाव) रुखसाना पठाण नामक मैत्रिणीच्या माध्यमातून साबीरशी ओळख झाली. साबीरने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मेरठला फोन करून आपल्या आईशी ओळख करून दिली. यावेळी साबीरच्या आईने प्रितीला लग्न करण्यास सांगितले. त्यानुसार सुमारे 5 महिन्यांपूर्वी प्रिती साबीर सोबत निघून गेली. नागपूर सोडल्यानंतर साबीर तिला सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील नोएडा येथे घेऊन गेला. त्याठिकाणी काही महिने वास्तव्य केल्यानंतर तिला घेऊन त्याने मेरठ गाठले. मेरठच्या एका मशिदीत तिचे धर्मांतरण करून तिचे नाव आफिया ठेवण्यात आले. त्यानंतर साबीरने तिच्याशी लग्न केले.
( हेही वाचा : खेड रेल्वे स्टेशनसमोर चक्क गांजाची विक्री! दोघांसह मुद्देमाल जप्त )
उत्तर प्रदेशातील मेरठहून परत आणले घरी
परंतु, लग्नानंतर साबीर आणि कुटुंबियांचे खरे स्वरूप तिच्यापुढे आले. त्यानंतर पिडीत तरुणीने नागपूरला आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली सत्य परिस्थिती सांगितली. तसेच यातून सोडवण्याची विनंती केली. मुलीचा फोन येताच व्यथित झालेल्या पालकांनी आविहींपच्या पदाधिकाऱ्यांना मदत मागितली. प्रितीच्या पालकांची समस्या ऐकल्यानंतर आविहींप आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मेरठ गाठले. तेथे जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मुस्लीम वस्तीतून प्रितीची सुटका करत तिला शनिवारी 25 डिसेंबर रोजी सुखरूप नागपुरात परत आणले. इतकेच नव्हे, तर पिडीतेचा शुद्धीकरण विधी करवून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेतले. प्रितीची या संकटातून सुखरूप सुटका करण्यासाठी आविहींपचे प्रांतमंत्री किशोर दिकोंडवार यांच्यासह विलास पुणेकर, दिलीप चकोले, कौस्तुभ आवळे, सोनू तिवारी, गोविंदा शेट्टी आदींचे सहकार्य लाभले.
Join Our WhatsApp Community