Love Jihad : सब अब्दुल वैसे ही हैं!

हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये का अडकतात आणि हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मुसलमान युवक का प्रयत्न करतात, या दोन्ही बाजूने विचार करण्याची गरज आहे.

295
Love Jihad : सब अब्दुल वैसे ही हैं!

प्रियांका शिंदे

‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) वगैरे काहीही नसते असे म्हणणाऱ्यांना दिवसागणिक वाढत जाणारी ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे दिसत नाहीत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. श्रद्धा वालकरपासून ते साक्षीच्या हत्याकांडापर्यंत ‘लव्ह जिहाद’ची प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. वृत्तपत्रात रखानेच्या रखाने भरून येत आहेत. तरीही ‘लव्ह जिहाद’मध्ये हिंदु तरुणी अडकण्याच्या घटना का समोर येत आहेत? श्रद्धाला मारणारा आफताब आणि साक्षीला मारणारा साहिल यांच्यासारखा ‘मेरा अब्दुल वैसा नहीं’ ही मानसिकता यामागे आहे. या अंध विश्वासामुळेच राजरोसपणे काही धर्मांध मुसलमान मुले हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी होतात. हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये का अडकतात आणि हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मुसलमान युवक का प्रयत्न करतात, या दोन्ही बाजूने विचार करण्याची गरज आहे.

संवाद लागला हरवू

कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आई – वडील दोघे नोकरी करतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. एकत्रित बसून कुटुंबात होणारा संवाद, विचारांची देवाणघेवाण होत नाही. मुलगी लहान असते तेव्हापासून तिच्यासोबत संवाद साधून तिच्याशी स्वधर्म अर्थात हिंदू धर्मातील संस्कार, विचार याविषयी बोलणे गरजेचे असते. हात जोडून देवाला नमस्कार कर, देवाला प्रार्थना कर, ही सृष्टी दाखवणाऱ्या आई-वडिलांचा आशीर्वाद घे, भारतीय पोशाख घाल, असे पालकांनी जाणीवपूर्वक मुलीला सांगितले पाहिजे. पण दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. आपल्या मुलीवर असे संस्कार केले पाहिजे की, ज्यामुळे तिला कोणताही धर्मांध ‘अब्दुल’ वश करू शकत नाही. ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे पाहता कुटुंब संकल्पना, आचार-विचार स्वातंत्र्य, संस्कार या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जेव्हा मुलगी किशोरवयीन आणि प्रौढ असते तेव्हा पालकांनी तिच्याशी अधिक संवाद साधायला हवा. कारण यादरम्यान तिचा मित्र परिवार अधिक असतो. यावेळी कोणतीही मुलगी तो कोणत्या धर्माचा आहे, या गोष्टींचा विचार न करता त्याच्याशी मैत्री करते. पण हिच मैत्री महागात पडू शकते. त्यामुळे पालकांनी अगोदरच सावध होऊन तिच्या मित्र परिवाराविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली, मुलीला काहीही करू द्यावे, तोकडे कपडे घालायला परवानगी देणे, आमचा मुलीवर पूर्ण विश्वास आहे, असे म्हणत तिला तिच्या मनासारखे अनिर्बंध वागायला सांगणे हे सध्याच्या काळात पालकांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे. मुलीच्या प्रत्येक गोष्टीवर पालकांचे लक्ष असायला पाहिजे. कारण जेव्हा मुलगी पाश्चात्य संस्कृती स्वीकारू लागते तेव्हा ती कौटुंबिक संस्कारापासून दूर जात असते आणि मग अशाच हिंदू मुली पुढे ‘अब्दुल’च्या (Love Jihad) सावज बनत असतात.

(हेही वाचा

प्रेम आंधळे असते!
प्रेम ही अशी गोष्टी आहे, जी आपल्याला काहीही करायला भाग पाडते. प्रेम करताना तरुणी मुलाचा धर्म बघत नाही, हे ‘अब्दुल’ (Love Jihad) सारख्या मुलांनी चांगलेच हेरले आहे. तरुणींना आपल्या मनातील गोष्टी ऐकून घेणारा, आपली काळजी घेणारा एखादा तरुण हवा असतो. पण हे म्हणजे आयुष्य नाही, असे मुलीला सांगता येईल इतका मोकळा संवाद पालकांचा असला पाहिजे. कारण सध्या अशा भ्रमात वावरणा-या हिंदू तरुणींना कसे हेरायचे, तिला प्रेमात कसे अडकवायचे, तिच्यामध्ये हिंदु धर्माबद्दला तिरस्कार निर्माण करून इस्लाम कसा श्रेष्ठ आहे हे कसे पटवून द्यायचे, याचे अब्दुलला व्यवस्थित प्रशिक्षण दिले जात आहे. ज्यामुळे हिंदू तरुणींना अब्दुल जवळचा वाटू लागतो आणि ती आई-वडिलांना सोडून अब्दुलसोबत पळून जाते. काही वेळेला तरुणीला अब्दुलचे खरे वास्तव समजते, ती सावध होते, पण त्यानंतर तिचे काय होते? याचा प्रत्यय आपण काही दिवसांपूर्वी घडलेल्या साक्षी हत्याकांडातून पाहिले आहे. तिचा भर रस्त्यात खून केला जातो. अब्दुल सारखा व्यक्ती तरुणीसोबत लग्न केल्यानंतर तिला धर्म स्वीकारण्याची सक्ती करतो, हिजाब घालण्याची सक्ती करतो, हिंदू देवदेवतांच्या मूर्ती न पूजायची सक्ती करतो आणि हे जर तरुणीने केले नाही तर मग मारहाण, बलात्कार करू लागतो. तसेच काही अब्दुल तरुणीला ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यासाठी भाग पाडतात आणि मग निकाह करण्यासाठी सक्ती करतात, जर तरुणीने याला नकार दिला, तर मग तिची हत्या करतो.

‘७२ हूरे’

नुकताच ‘७२ हुरें’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तेव्हापासून ‘७२ हुरें’ या संकल्पनेची अधिक चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशीदी यांनी ‘७२ हुरें’ याबाबत सांगितले आहे. जेव्हा मुस्लिम तरुण जिहाद (Love Jihad) करताना मरतो, तेव्हा त्याला जन्नतमध्ये ‘७२ हुरें’(सुंदर तरुणी) मिळतात. या ‘७२ हुरें’ मिळणे हे त्याच्या चांगल्या कामाचे प्रतिक असते. तसेच जन्नतमध्ये दारू वगैरे दिली जाते, ज्याला इस्लाम धर्मात शराब-ए-तहूर म्हटले जाते. ते अल्लाहकडून मिळालेले शुद्ध पाणी असते, असे साजिद रशीदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुसलमान तरुण ज्या पद्धतीने जिहाद करतात ते जन्नतमध्ये ‘७२ हुरें’ आणि दारू पिण्यासाठी करतात का? पण यामुळे हिंदू तरुणींचे जीवन उद्धवस्त होत आहे. म्हणून हिंदू तरुणींनी लवकर आपल्या स्वधर्मसाठी जागृत व्हायला हवे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.