वाळूचे कण राज्यातील वातावरणातून विरुन गेल्यानंतर आता मुंबईपाठोपाठ पुण्यातील वातावरण पूर्ववत होत आहे. थंडीचा कडाका कायम असल्याने स्थानिक धूलिकणांच्या प्रभावाने पुण्यातील हवेचा दर्जा मंगळवारी खराबच राहिल्याची माहिती सफर या वेधशाळा आणि आयआयटीएम या केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्यावतीने सुरु केलेल्या प्रणालीतून दिला गेला. संपूर्ण पुण्यातील हवेचा दर्जा २४९ वर नोंदवला गेला. मात्र पुण्यातील विविध ठिकाणी सूक्ष्म धूलिकण जास्त दिसून आले.
पुण्यातील हवेचा दर्जा खराब
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मात्र मंगळवारी सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वातावरणात कमी आढळून आले. भुंकर चौक वगळता पुण्यातील इतर भागांत हवेचा दर्जा खराब दिसून आला. भुंकर चौकात पुण्यातील एकूण हवेच्या तुलनेत फारच जास्त होता. भुंकर चौकात सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण ३०४वर पोहोचली. त्याखालोखाल आळंदीत आणि भोसरीत सूक्ष्म धूलिकणांची मात्रा २९७ तर शिवाजीनगर परिसरात २९३ एवढी धूलिकणांची मात्रा नोंदवली गेली. निगडीत २८६ तर पाषाण येथे २५९ एवढे धूलिकणांचे प्रमाण होते.
( हेही वाचा : हुश्श! वाळूचे धूलिकण गायब, तरीही हवेचा दर्जा ढासळलेलाच… )
आरोग्याची काळजी घेताना
अतिधोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास करणे टाळा. दमेकरी रुग्णांनी सोबत औषध ठेवा. मोठ्या अंतराचा पायी प्रवास हळूहळू पार करावा. सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांच्या दवाखान्यात जा. काही जणांना चक्कर येण्याचीही समस्या उद्भवू शकते. हवेच्या संपर्कात असताना अतिताणाची कामे करु नका. सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांच्या दवाखान्यात जा.
Join Our WhatsApp Community