LPG सिलिंडरच्या खाली ‘ही’ छिद्रे का असतात? तुम्हाला माहितीये? वाचा काय आहे कारण

154

आज प्रत्येक घरो-घरी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG चा वापर केला जातो. स्वयंपाकघरात असणाऱ्या या सिलिंडरवर रोज अन्न शिजवले जाते. हे एलपीजी गॅस सिलिंडर लोखंडाचे असते. बहुतांश घरांमध्ये LPG चा वापर केला जातो पण तुम्ही या गॅस सिलिंडरचे कधी काळजीपूर्वक निरीक्षण केले आहे का…जर केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सिलिंडरच्या खालच्या बाजूला काही छिद्रे दिलेली असतात. याच खालच्या भागावर संपूर्ण सिलिंडरचा भार असतो. पण सिलिंडरच्या या खालच्या भागावर ही छिद्रे कशासाठी दिलेली असतात, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का…. ही छिंद्रे म्हणजे कोणतीही डिझाईन नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

हे आहेत वैज्ञानिक कारण

सिलिंडरच्या खालच्या बाजूस देण्यात आलेल्या या छिद्रांचा खूप उपयोग असून ते अत्यंत कामाची असतात. या छिद्रांचा वापर सिलिंडरमध्ये भरलेल्या एलपीजी गॅसचे तापमान नियंत्रित करण्यासाठी केला जातो. अनेक वेळा असे घडते की गॅस सिलिंडरचे तापमान वाढते. अशा परिस्थितीत, या छिद्रातून हवा पास होते, ज्यामुळे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ते पृष्ठभागाच्या उष्णतेपासून सिलिंडरचे संरक्षण देखील करते. एकूणच, या छिद्रांमुळे गॅस सिलिंडरचे अपघातांपासून संरक्षण होते.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या ‘या’ FREE सेवांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या!)

यासोबतच सिलिंडरच्या खालच्या बाजूला छिद्र असण्याचा आणखी एक फायदा आहे. या छिद्रांमुळे सिलिंडरच्या खाली सफाई साफ करणे सोपे होते. जेव्हा आपण घराची फरशी पाण्याने धुतो तेव्हा या छिद्रामुळे पाणी सिलिंडरच्या खाली साठत नाही.

सिलिंडरला विशेष रंगच का असतो?

गॅस सिलिंडरच्या छिद्रांव्यतिरिक्त अनेक माहिती नसलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही पाहिलेच असेल की सर्व एलपीजी सिलिंडर फक्त लाल रंगाचे असतात. याशिवाय त्यांचा आकार दंडगोलाकार असतो. यामागेही वैज्ञानिक कारणं आहेत. दरम्यान, सिलिंडरचा रंग लाल ठेवण्यात आला आहे जेणेकरून सिलिंडर दूरवरूनही स्पष्टपणे दिसून यावे. त्यामुळे सिलिंडरची वाहतूक सुलभ होते. गॅस वाहतूक करणारे टँकरही याच आकाराचे असतात. गॅस आणि तेल समान प्रमाणात दंडगोलाकार आकारात पसरतात. अशा परिस्थितीत गॅस साठवणे हा एक सुरक्षित पर्याय आहे, त्यामुळे गॅस सिलिंडरही दंडगोलाकार असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.