सीमावर्ती भागांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, शांती ही प्रेमातून नव्हे, सामर्थ्यातूनच येते, असे स्पष्ट मत लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा यांनी व्यक्त केले. (Lt. Colonel Manoj Kumar Sinha)
सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शनिवारी, २१ ऑक्टोबरला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, कॅप्टन संजय पराशर, कॅप्टन सिकंदर रिझवी यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर आदी उपस्थित होते. (Lt. Colonel Manoj Kumar Sinha)
अतिशय शांत भागात रस्त्याच्या मधोमध काही सिंह बसलेले पाहून मागे वळणाऱ्या वाहनांच्या दृश्य सादरीकरणाद्वारे सिन्हा म्हणाले की, सिंहाच्या जागी काही कुत्रे असते तर नक्कीच हे चालक त्यांना चिरडून पुढे गेले असते. यावरून बोध घ्या आणि मनातून एक गोष्ट काढून टाका की, प्रेमातून शांती येऊ शकते. शांती केवळ ताकदीद्वारेच येऊ शकते आणि येईल. त्यामुळे ‘शांततेसाठी शक्तीची गरज’ या संकल्पनेचा प्रसार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Lt. Colonel Manoj Kumar Sinha)
(हेही वाचा – Captain Sanjay Parashar : शालेय पुस्तकांतून इस्लामीकरणाचे धडे देणाऱ्या पाकिस्तानकडून शांतीची अपेक्षा काय करता?)
दहशतवाद्यांच्या मानसिकतेशी दिला लढा
जम्मू आणि काश्मिरमधील दहशतवाद्यांना सामोरे जाण्याच्या त्यांच्या एका उपक्रमाची माहिती देताना सिन्हा म्हणाले, “मला जाणीव झाली की आपल्याला त्यांच्या मानसिकतेशी लढावे लागेल. त्यामुळे मी तशी स्ट्रॅटर्जी आखली. स्थानिकांकडे जिहादसाठी तरुणांची मागणी करायला येणाऱ्यांना मी काही प्रश्न विचारायला सांगितले. जर या दहशतवाद्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले, तर मी त्यांना स्वतःहून सीमापार घेऊन जाईन, असा शब्द मी त्यांना दिला. माझी युक्ती फळाला आली. त्यामुळे माझ्या कार्यकाळात जम्मू-काश्मिरमधील एकही तरुण नव्याने दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाला नाही”, अशी आठवण सिन्हा यांना सांगितली. (Lt. Colonel Manoj Kumar Sinha)
…अन् सभागृह झाले भावूक
सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतीच्या जीवनाचे हृदय पिळवटून टाकणारे वर्णन करताच संपूर्ण सभागृह भावूक झाले. दहशतवाद्यांनी एका तरुणीवर अनेक दिवस बलात्कार केल्यानंतर तिच्या स्त्रीत्वाला बसलेल्या जबर धक्क्याचे वर्णन त्यांनी कवितेच्या माध्यमातून केले. सिन्हा म्हणतात, ”वो कहते हैं करने आए हैं जिहाद, देखो कैसे कर रहे हैं सब बर्बाद”. या कवितेला त्यांच्या मुलीने आवाज दिला आहे. (Lt. Colonel Manoj Kumar Sinha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community