पंजाबच्या लुधियानामधील ग्यारसपुरा परिसरात रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी विषारी वायूच्या गळतीमुळे (Ludhiana gas leak) नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास एक किलोमीटरचा परिसर सील केला आहे.
'Dead bodies turned blue': 11 killed in #Ludhiana gas leak, victims' kin narrate horror | LIVEhttps://t.co/PApIkKO3n7
— TIMES NOW (@TimesNow) April 30, 2023
(हेही वाचा – सोने तस्करीत महिला गॅंग सक्रिय! ९ केनियन महिलांना अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, गोयल मिल्क प्लांटमध्ये सकाळी सव्वा सातच्या सुमारास वायू गळती (Ludhiana gas leak) झाली. या ठिकाणी मोठ्या कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ ठेवले जातात. त्यानंतर त्याचा पुढे पुरवठा केला जातो. प्राथमिक माहितीनुसार दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायूची गळती झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच अग्निशमन विभागाच्या मदतीने बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक किलोमीटपर्यंतचा परिसर सील केला असून वायू गळती होण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे. या इमारतीत दुधाचे केंद्र आहे. सकाळी दूध घेण्यासाठी गेलेले नागरिक बेशुद्ध झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. वायू गळती झालेल्या इमारतीच्या ३०० मीटरच्या आत लोक बेशुद्ध झाले. दरम्यान कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही.
हेही पहा –
लुधियाना पश्चिमच्या उपविभागीय अधिकारी स्वाती यांच्या माहितीनुसार, हे गॅस गळतीचे (Ludhiana gas leak) प्रकरण आहे. एनडीआरएफची टीम लोकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी हजर असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून ११ जणांना त्रास झाला आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त समीर वर्मा यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, बेशुद्ध पडलेल्या ५-६ जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा परिसर सील करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून दखल
दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही गॅस गळतीच्या (Ludhiana gas leak) घटनेची दखल घेतली आहे. लुधियानाच्या ग्यारसपुरा भागातील कारखान्यातून गॅस गळतीची घटना अत्यंत दुःखद आहे. पोलीस, सरकार आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community