मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आरे दुग्ध वसाहतीत लम्पीबाधित जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे तेथून १० किमीपर्यंतचे क्षेत्र बाधित म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मंगळवारी दिली.
( हेही वाचा : TET Scam : वेतन बंद केलेल्या शिक्षकांना अंतरिम दिलासा; औरंगाबाद खंडपीठाने दिले ‘हे’ निर्देश )
आरे दुग्ध वसाहत प्रक्षेत्रातील काही जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मुंबई उपनगर जिल्हा प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकारातून आरे दुग्ध वसाहतील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटरपर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे निधी चौधरी यांनी सांगितले.
खबरदारी काय घेणार?
लम्पी रोगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. वरील ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे. याकरिता उपआयुक्त पशुसंवर्धन (गुणनियंत्रण) यांनी आरे दुग्ध वसाहतीत आणि मुंबई पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने आरे दुग्ध वसाहत वगळून मुंबई उपनगर जिल्हा येथे नियोजन करून १०० टक्के लसीकरण करावे, अशा सूचना चौधरी यांनी दिल्या.
Join Our WhatsApp Community