महाराष्ट्रात लम्पी आजाराचा फैलाव वेगाने होताना दिसतोय. महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील ३९६ गावांमध्ये लम्पीचा प्रसार झाला आहे. मात्र चिंताजनक म्हणजे कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात म्हणजेच औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यातील उंडणगावामधील १० जनावरं लम्पी आजाराने दगावली आहेत. या गावातील अनेक जनावरांना या आजाराची लागण झाल्याने पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
(हेही वाचा – शेअर बाजारातील तेजीला मोठा ब्रेक! सेन्सेक्स 475 तर निफ्टी 133 अंकांनी घसरला)
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यात लम्पी आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. मात्र लागण झाल्यानंतर जनावरांना तत्काळ उपाचर देण्यात आले आहे. त्यामुळे जनावरांमधील लम्पीचा धोकाही कमी झाला आहे. मात्र सिल्लोडमधील उंडणगावात तब्बल १० जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भामुळे संपूर्ण राज्यात चिंतेचं वातावरण असून राज्यभर जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही जनावरांचा बाजार, जत्रा, प्रदर्शनासह जनावरांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा तातडीने सूचना दिल्या आहेत. तर या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे. यासह प्रत्येक गावात मोफत लस देण्यात यावी, असे आदेशही राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community