लंडनमधून चोरण्यात आलेली जवळपास 3 लाख डाॅलरची (2 कोटी 39 लाख 17 हजार 395 भारतीय रुपये) आलिशान बॅटले मल्सैन सेडान कार पाकिस्तानच्या कराची शहरात सापडली आहे.
कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीकडून मिळाल्यानंतर, पाकच्या सीमाशुल्क अधिका-यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला. अधिका-यांना आत कार आढळून आली. चोरांना बॅटेलमधील ट्रेसिंग ट्रॅकर काढता आला नाही. त्यामुळे ब्रिटिश पोलिसांना कारचा अचूक ठावठिकाणी शोधता आला. तपासात कारचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे आढळले. चोरीला गेलेल्या कारच्या चेसीस क्रमांकासह अन्य माहिती पाकिस्तानी सीमाशु्ल्क विभागाला पुरवली होती. कराचीतील कारचा चेसीस क्रमांक ब्रिटिश पोलिसांनी दिलेल्या चेसीस क्रमांकाशी जुळला.
( हेही वाचा: सरकारचे पत्रकारांना गिफ्ट, सिडकोचे घर घेणे होणार सोपे )
Join Our WhatsApp Community