अभ्युदयनगरची माय माऊली: नवरात्रौत्सव मंडळाकडून समाजपयोगी, मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन

255

मुंबईच्या गिरणगावातील अभ्युदयनगर वसाहतीत इमारत क्रमांक २०, संकल्प सिद्धी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थित एम. आर. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ येथे गेली ३७ वर्ष शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी कोरोना काळातही यात खंड पडला नाही.

वर्षभर मंडळाकडून सांस्कृतिक व समाजपयोगी कार्यक्रम

या नवरात्रौत्सवाची विशेषता म्हणजे देवीचे स्वरूप प्रथम वर्षापासून हे बंगाली पद्धतीचे आहे. नवरात्रौत्सव काळात सतत नऊ दिवस फक्त गरबा न खेळता एकच दिवस गरबा खेळला जातो, तर बाकीच्या दिवशी विविध सांस्कृतिक व समाजपयोगी मार्गदर्शनपर कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. मंडळाचे उपक्रम हे वर्षभर सुरू असतात अगदी करोना काळातही जेव्हा विविध रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत होती, तेव्हा मंडळाने सिद्धिविनायक न्यासाच्या मदतीने काळाचौकी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून ७० हून अधिक रक्ताच्या युनिट संकलित करून दिले.

(हेही वाचा – मुंबईची ‘मुंबादेवी’! बघा व्हिडिओ)

अभ्युदयनगरची माय माऊली या नावाने देवी प्रसिद्ध

आत्तापर्यंत विविध आदिवासी पाड्यात मंडळांनी मोफत आरोग्य शिबिराचे, नेत्रदानाची प्रतिज्ञापत्रे भरण्याचे आयोजन केले आहे. आताच्या काळात नवरात्रौत्सवाला जे व्यापारी स्वरूप येत आहे त्या दृष्टीने न पाहता मंडळांनी कायमच सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर दिला आहे. पारंपरिक पद्धतीने देवीचा गोंधळ मांडला जातो. तसेच अष्टमी होम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय नीटनेटक्या व मोठ्या स्वरूपात पार पडतो. यंदा सोमवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी होम हवन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नवरात्रौत्सव काळात विविध क्षेत्रातील मान्यवर देवीचा आशीर्वाद घेतात. संपूर्ण विभागात देवी अभ्युदयनगरची माय माऊली या नावाने प्रसिद्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.