अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव करणारे भारतीय राजकारणी Madhavrao Scindia

248
अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव करणारे भारतीय राजकारणी Madhavrao Scindia
अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव करणारे भारतीय राजकारणी Madhavrao Scindia

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव कोणी केला होता. तर, ज्योतिरादित्य सिंधिया आता भाजपात स्थित झाले आहेत. मात्र माधवराव सिंधिया हे शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये होते. माधवराव सिंधिया (Madhavrao Scindia) यांचा जन्म १० मार्च १९४५ रोजी मुंबईत झाला. ते भारतीय राजकारणी आणि मंत्री होते. १९६१ मध्ये वडील जिवाजीराव यांच्या निधनानंतर माधवराव ग्वाल्हेरचे शेवटचे नामधारी महाराज बनले. १९७१ मध्ये भारताच्या राज्यघटनेतील २६ व्या दुरुस्तीनंतर, भारत सरकारने पदव्या, विशेषाधिकार आणि मानधन यांसह संस्थानांची सर्व अधिकृत चिन्हे रद्द केली.

(हेही वाचा – West Bengal : अखेर ममता बॅनर्जींनाही आठवला प्रभु श्रीराम; प्रथमच दिली रामनवमीची सुट्टी)

सलग नऊ वेळा लोकसभेचे खासदार

माधवराव सिंधिया यांचे शिक्षण सिंधिया स्कूलमधून झाले. सिंधिया स्कूल त्यांच्या कुटुंबाने ग्वाल्हेरमध्ये बांधले होते. त्यानंतर माधवराव सिंधिया यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठातून शिक्षण पूर्ण केले. राजेशाही संपल्यानंतर माधवराव सिंधिया यांनी गुनामधून निवडणूक लढवली. १९७१ मध्ये ते केवळ २६ वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. ते सलग नऊ वेळा लोकसभेचे खासदार होते.

विमान अपघातात मृत्यू

विशेष म्हणजे १९८४ मध्ये त्यांनी ग्वाल्हेरमधून भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. सिंधिया यांची राजकीय कारकीर्द यशस्वी होती. मात्र त्यांचे त्यांच्या आईसोबत पराकोटीचे मतभेद होते. त्यांच्या आईने त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. १९९० ते १९९३ दरम्यान ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष देखील राहिले. ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी दिल्लीहून कानपूरला जात असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (Madhavrao Scindia)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.