मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये मंगळवारी, ९मेच्या सकाळी मोठी दुर्घटना घडली. एका ५० फूट उंच पुलावरून प्रवासी बस थेट कोरड्या नदीत कोसळली. यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
खरगोनचे पोलीस अधिकारी धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, बस पुलावरून पडल्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – Pune Accident: दिवे घाटात भीषण अपघात; दोघा जणांचा मृत्यू)
या दुर्घटनेतील बसमध्ये अनेक प्रवासी होती. ज्यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश होता. दरम्यान जखमींना स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जवळच्या जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी रुग्णवाहिका उशीरा पोहोचल्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. माहितीनुसार, ७ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
अपघातग्रस्त बस शारदा ट्रॅव्हल्सची आहे, जी खरगोनहून इंदौरला जात होती. त्याचवेळेस खरगोन मार्गावर ही दुर्घटना घडली. नदीवरील पुलावरून जात असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रेलिंग तोडून खाली पडली. यावेळी खूप मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी पटकन धाव घेतली आणि घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community