मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे अॅमेझॉनच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी या ई-कॉमर्स कंपनीने तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तिरंगा छापलेले बूट विकल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचे निर्देश दिले.
सोशल मीडियामधून विरोध
गृहमंत्री मिश्रा यांच्या निर्देशानंतर सहा तासांच्या आतच मंगळवारी अॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी गुन्हा दाखल केला. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त अॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सेल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सेलसोबतच राष्ट्रध्वज छपलेले बूट विक्रीचे फोटोही देण्यात आले आहेत. सोशल मीडिया यूजर्स याप्रकरणी कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत.
(हेही वाचा बेस्ट प्रवाशांचे हाल! काय आहे कारण?)
ऑनलाइन ड्रग्सची डिलीव्हरी करण्याचा मुद्दाही गाजला होता
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती मिळताच मंगळवारी कंपनी विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात डीजीपींना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, असे कृत्य सहन केले जाणार नाही, असे मिश्रा म्हणाले. अॅमेझॉन कंपनीबाबत जी माहिती समोर आली आहे, ती वेदनादायक असून मध्य प्रदेशात हे खपवून घेतले जाणार नाही. देशाचा अपमान होईल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. पोलिस कारवाई केली जाईल, असे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वीही राज्यात ऑनलाइन ड्रग्सची डिलीव्हरी करण्याचा मुद्दाही गाजला होता.
भारताचा नकाशाचे स्टिकर विकले
अॅमेझॉनने भारताच्या नकाशाचे स्टिकर अॉनलाईन विकले. त्याचाही विरोध आला.
ये देखो, @amazon पर भारत के मानचित्र के स्टिकर की बिक्री !
भारत के मानचित्र का विकृतीकरण करनेवाले स्टिकर बेचनेवाले ऍमेझॉन का बहिष्कार करें !#BoycottAmazon @HMOIndia@HinduJagrutiOrghttps://t.co/j4sP6PkyZS @Ramesh_hjs pic.twitter.com/vN97jhZS0z
— Sandeep Shinde (@sanatandeep_) January 25, 2022
अॅमेझॉनने भारताच्या झेंड्याचे चित्र छापलेले टी शर्टवर अॉनलाईन विकले. त्याचाही विरोध आला.
Join Our WhatsApp CommunityThis #RepublicDay nationalist Indians have given a call to #BoycottAmazon
How about you ? pic.twitter.com/o3LRDtxtjU
— Guruprasad Gowda (@Gp_hjs) January 25, 2022