मोबाईल बंद ठेवा, फोटो काढू नये अशाप्रकारचे संदेश फलक अनेक मंदिरांमध्ये लावलेले असतात. परंतु आता थेट मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई खंडपीठाने मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तिरुचेंदुरच्या सुब्रह्मण्यम स्वामी मंदिर प्रशासनाकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीमध्ये संपूर्ण तामिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई खंडपीठाने तामिळनाडू सरकारला दिले. यावेळी मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आमदार राजन साळवींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस)
सुब्रह्मण्यम स्वामी मंदिर प्रशासनाने मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरात पावित्र्य आणि शुद्धता राखण्यासाठी मोबाईल फोनवर बंदी असावी असे या आदेशात नमूद करण्यात आल्याचे वृत्त लाईव्ह लॉने दिले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर महादेवन आणि न्यायमूर्ती जे सत्य नारायण प्रसाद यांच्या खंडपीठाने मंदिरात मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे. तसेच मंदिरात येणाऱ्या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. निकाल देताना खंडपीठाने केवळ सुब्रह्मण्यम स्वामी मंदिरातच नाही तर संपूर्ण तामिळनाडूमधील मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. गैरसोय होऊ नये म्हणून फोन ठेवण्यासाठी मंदिराबाहेर व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp CommunityMadras High Court bans the use of mobile phones and cameras inside temple premises to maintain purity and sanctity and to ensure attention of the devotees is not diverted.
— Live Law (@LiveLawIndia) December 3, 2022