विश्वनाथन शांता (Viswanathan Shanta) उपाख्य व्ही. शांता ह्या भारतीय कर्करोग तज्ज्ञ होत्या आणि चेन्नईच्या अड्यार कॅन्सर इंस्टिट्युटच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी भारतातील रूग्णांसाठी दर्जेदार आणि परवडणारे कर्करोग उपचार उपलब्ध करून दिले. शांता यांचा जन्म ११ मार्च १९२७ रोजी चेन्नईच्या मैलापूर येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा सी. व्ही. रमण आणि काका एस. चंद्रशेकर यांना दोन नोबेल पारितोषिक मिळाले होते.
त्यांचे शालेय शिक्षण नॅशनल गर्ल्स हायस्कूलमधून झाले आणि वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी डॉक्टर होण्याचा दृढ निश्चय केला. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्री-मेडिकलचा अभ्यास केला आणि १९४९ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पूर्न केले, १९५२ मध्ये डी.जी.ओ. तर १९५५ मध्ये एम.डी. चा अभ्यासक्रम पूर्ण केला.
(हेही वाचा राहुल गांधी मानसिक संतुलन बिघडलेले; काँग्रेस बुडणारे जहाज; Acharya Pramod Krishnam यांची घणाघाती टीका)
शांता (Viswanathan Shanta) यांनी आपले सबंध जीवन कर्करोगाच्या रुग्णांना अर्पण केले होते. कर्करोगाच्या रूग्णांची काळजी घेणे, रोगाचा अभ्यास करणे, त्याचे प्रतिबंध आणि उपचार यावर संशोधन करणे, रोगाबद्दल जागरूकता पसरवणे आणि ऑन्कोलॉजीच्या विविध उप-विशेषतांमध्ये तज्ञ आणि शास्त्रज्ञांनी फळी निर्माण करणे या ध्येयासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते.
त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी त्यांना मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९ जानेवारी २०२१ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे (Viswanathan Shanta) निधन झाले. आतल्या रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या ह्रदयात मोठ्या प्रमाणात ब्लॉक्स असल्याने त्यांच्यावर उपचार करता आले नाही. पण त्यांनी कर्करोग रुग्णांसाठी खूप मोठे काम करुन ठेवले आहे, ज्याचे पांग कधीही फेडता येणार नाही.
Join Our WhatsApp Community