महा मेट्रोने रेल्वे ट्रॅकवर लाँच केलं तब्बल ८०० टनांचं गर्डर!

102

तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत असून शुक्रवारच्या मध्यरात्री भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८० मीटर लांब आणि ८०० टन वजनाचे स्टील गर्डर यशस्वीरीत्या लाँच केले.

इतिहासात प्रथमच २२ मीटर रुंद स्टील गर्डर लाँच

भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८०० टन वजनाचे स्टील गर्डर स्थापित होणे हा अनोखा रेकॉर्ड आहे. देशात पहिल्यांदाच १६५० टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात करण्यात येत आहे. मेट्रोतर्फे स्थापित करण्यात आलेल्या ८०० टन वजनाच्या स्टील गर्डरला ३२ हजार एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला असून संपूर्ण स्ट्रकचरला ८० हजार बोल्टचा वापर केल्या जात आहे. या स्टील गर्डरची जमीनीपासूनची उंची ३२ मीटर आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच २२ मीटर रुंद स्टील गर्डर स्थापित करण्यात आला. देशात पहिल्यांदा ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था स्थापित केल्या जात आहे. महा मेट्रोने निर्माण कार्यादरम्यान अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड स्थापित केले असून या रेकॉर्डची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची होतेय फसवणूक!)

महा मेट्रोने मैलाचा दगड केला स्थापित 

भारतात पहिल्यांदाच ४ स्तरीय वाहुतुक व्यवस्था नागपूर शहरात निर्माण केल्या जात असून आव्हानात्मक अशा रेल्वे ट्रॅकच्यावर सुमारे ४.३० तासाचा रेल्वे ब्लॉक घेऊन सदर कार्य पूर्ण करत महा मेट्रोने मैलाचा दगड स्थापित केला आहे. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी रेल्वे ट्रॅकच्यावर कार्य यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मेट्रो कामगार आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केलेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.