Mahabaleshwar Temple : महाबळेश्वरमधील या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट दिली आहे का ?

24
Mahabaleshwar Temple : महाबळेश्वरमधील या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट दिली आहे का ?
Mahabaleshwar Temple : महाबळेश्वरमधील या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट दिली आहे का ?

महाबळेश्वर (Mahabaleshwar Temple) हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे. महाबळेश्वरला जुन्या मुंबई (Mumbai) प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उदयाने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे. (Mahabaleshwar Temple)

श्रीक्षेत्र महाबळेश्वर
महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव (महाबली) (Mahabali) यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे. जुन्या महाबळेश्वर मध्ये महादेवाचे आहे, यालाच क्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात. महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत, तसेच १३ व्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर (Krishnabai Temple) आहे. (Mahabaleshwar Temple)

महाबळेश्वर त्याच्या स्ट्राबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच महाबळेश्वर हे शेत ताज्या स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी यासाठी सुद्धा प्रसिध्द आहे. तसेच आपण जेली, मध, जाम आणि बरेच काही विकत घेऊ शकता. एखादा हातमाग, चामड्याच्या वस्तू, कोल्हापुरी पादत्राण ई. वस्तू टाउन बझारमधून खरेदी करू शकतो. (Mahabaleshwar Temple)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.