Mahakali Mantra : महाकाली मंत्राचा जप करा आणि अद्भुत चमत्कारिक परिणाम मिळवा!

काली मंत्रांचा (Mahakali Mantra) जप सकाळी करता येतो. पण सूर्यास्तानंतर मंत्रांचा जप केल्यास अधिक लाभ मिळतो. अमावस्येच्या दिवशी काली मंत्रांचा जप करणे अधिक फायदेशीर आहे.

798
Mahakali Mantra : महाकाली मंत्राचा जप करा आणि अद्भुत चमत्कारिक परिणाम मिळवा!

भाविकहो, माता काली ही पृथ्वीची संरक्षक आहे. या देवतेला हिंदू धर्मात कालिका म्हणून ओळखले जाते. परंतु देवीच्या संहारक शक्तीमुळे तिला काली माता असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, काली हा शब्द संस्कृत शब्द कालपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे, वेळ… म्हणून देवी काली वेळ, बदल, शक्ती, निर्मिती, संरक्षण आणि विनाश यांचे प्रतिनिधित्व करते. (Mahakali Mantra)

नावाप्रमाणेच काली (Mahakali Mantra) या शब्दाचा अर्थ “काळा” असा होतो. संस्कृत विशेषण कालाची ही स्त्रीलिंगी संज्ञा आहे. अध्यात्मिक ग्रंथांनुसार, देवी काली ही दुर्गा/पार्वतीचे उग्र रूप आणि भगवान शिवची पत्नी मानली जाते. ब्रह्मांडातील वाईट शक्तींचा नाश करण्यासोबतच, काली मां भक्तीभावाने तिची उपासना करणाऱ्यांच्या चांगल्या कर्मांचे चांगले फळ देखील देते. म्हणून जे लोक देवी कालीची अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात, देवी काली त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते. (Mahakali Mantra)

आपल्याकडे असं म्हटलं जातं की मां कालीची पूजा किंवा उपासना फक्त तांत्रिक अघोरी साधू करतात, कारण माँ कालीची पूजा करणे खूप कठीण आहे आणि त्यासाठी खूप संयम लागतो. पण काली मातेचे काही सोपे मंत्र (Mahakali Mantra) आहेत ज्यांचा वापर करून सामान्य माणूसही आपल्या आयुष्यातील संकटांवर सहज मात करू शकतो. (Mahakali Mantra)

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांचा ‘तो’ आदेश निघाला खोटा; भाजपाची आपच्या मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी)

काली बीज मंत्र :

“ॐ क्रीं काली”

काली बीज मंत्राचा (Mahakali Mantra) जप केल्याने सर्व वाईट शक्तींपासून संरक्षण होते. काली बीज मंत्राचा भक्तिभावाने जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मकता पसरते. (Mahakali Mantra)

काली मंत्र :

“ॐ क्रीं कालिकायै नमः”

या मंत्रामुळे (Mahakali Mantra) व्यक्तीच्या मनातील गोंधळ दूर होतो. या काली मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला अपार ज्ञान प्राप्त होते. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येत असेल तर हा मंत्र तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. (Mahakali Mantra)

महाकाली मंत्र :

“ॐ श्री महा कलिकायै नमः”

माता कालीला प्रसन्न करण्यासाठी महाकाली मंत्राचा (Mahakali Mantra) जप करावा. महाकाली मंत्र हे एकप्रकारचे संरक्षक कवच आहे. महाकाली मंत्राच्या शक्तीमुळे सर्व गोष्टींपासून संरक्षण मिळते. (Mahakali Mantra)

(हेही वाचा – IPL 2024 Schedule : आयपीएलच्या २०२४ च्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक; सामने कुठे, कधी होणार?)

काली गायत्री मंत्र :

“ॐ कालिकायै च विद्महे, श्मशानवासिन्यै धीमहि, तन्नो काली प्रचोदयात्”

काली गायत्री मंत्राच्या जपामुळे (Mahakali Mantra) मां कालीच्या आशीर्वादाने माणसाच्या सर्व सांसारिक समस्या दूर होतात. काली गायत्री मंत्र भाविकाला त्याची वैयक्तिक कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यास मदत करतो. या मंत्रामुळे भिती देखील दूर होते. (Mahakali Mantra)

महाकाली मंत्राचा जप असा करावा :

काली मंत्रांचा (Mahakali Mantra) जप सकाळी करता येतो. पण सूर्यास्तानंतर मंत्रांचा जप केल्यास अधिक लाभ मिळतो. अमावस्येच्या दिवशी काली मंत्रांचा जप करणे अधिक फायदेशीर आहे. मां काली मंत्र जप किंवा पूजा करताना लाल रंगाचे कपडे घाला कारण मां कालीला हा रंग आवडतो. माँ कालीची मूर्ती किंवा चित्र लाल कपड्यावर ठेवा आणि मंत्र म्हणा. मंत्रजप करताना मां कालीला लाल फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा. काली मंत्राचा जप करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. काली मंत्राचा जप किमान ४० दिवस सतत करावा. (Mahakali Mantra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.