महाकवी वीर सावरकर गीत गायन स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ

168

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि कलांगण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ३० मे २०२२ रोजी महाकवी सावरकर अंतिम गीत गायन स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

( हेही वाचा : समाजक्रांतिकारकाची यशोगाथा : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी पर्वाचा ‘महती’पट)

सायंकाळी ठीक ६.१५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात अंतिम स्पर्धेसाठी मुंबईसह महाराष्ट्रातून निवडले गेलेले २० गुणवंत बाल आणि युवा स्पर्धक वीर सावरकरांची दर्जेदार गीते विशेष वाद्यवृंदासह सादर करणार आहेत. या स्पर्धेचे एक खास वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा एखादी स्पर्धा ऐकतो तेव्हा आपण सुद्धा मनात परीक्षण करत असतो. एक श्रोता म्हणून आपला ही विचार सुरू असतो, तर महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षकांच्या बरोबरीने एका विशेष बक्षिसासाठी श्रोत्यांचे मत सुद्धा गृहीत धरले जाणार आहे. अर्थातच त्यासाठी काही अटी आहेत. त्यामुळे सावरकर काव्य, संगीत प्रेमी मंडळींनीही संपूर्ण स्पर्धा ऐकण्यासाठी आणि आपले बहुमूल्य मत देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानासाठी नियम

मतदान करण्यासाठी श्रोत्यांचे वय १६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून सायंकाळी ६.१५ नंतर सभागृहात प्रवेश करणाऱ्यांना मतदान करता येणार नाही.

गीते : स्वातंत्र्यवीर सावरकर, रणजित सावरकर, समीर सामंत, श्रीनिवास शिंदगी
संगीत दिग्दर्शन : वर्षा भावे
स्वर संयोजन : कमलेश भडकमकर
वादक : अर्चिस लेले, अनिल करंजवकर, हनुमंत रावडे, सागर साठे, श्रुती भावे, कमलेश भडकमकर

विशेष सहयोग : मंजिरी मराठे, रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर, स्वप्नील सावरकर, स्मारक कर्मचारी वर्ग आणि कलांगण टीम.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.