Mahanagar Gas cng Station : जाणून घेऊया सीएनजी इंधन आणि गॅस स्टेशनविषयी 

Mahanagar Gas cng Station : महाराष्ट्रात नेमकी किती सीएनजी स्टेशन आहेत?

110
Mahanagar Gas cng Station : जाणून घेऊया सीएनजी इंधन आणि गॅस स्टेशनविषयी 
Mahanagar Gas cng Station : जाणून घेऊया सीएनजी इंधन आणि गॅस स्टेशनविषयी 
  • ऋजुता लुकतुके 

सीएनजी म्हणजे ‘कम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ हे एक जीवाश्म इंधन आहे, जे पेट्रोल आणि डिझेल या इंधनांना पर्याय म्हणून दुचाकी, रिक्षा आणि चारचाकींमध्ये वापरलं जातं. वाहनांमध्ये तो जास्त प्रमाणात भरता यावा यासाठी हा वायू दाबून बसवलेला असतो. आणि उच्च दाबाने तो इंधनाच्या टाकीत सोडला जातो. भारतात खासकरून शहरांमध्ये जवळ जवळ सगळ्या रिक्षा, टॅक्सी व सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतील बस या सीएनजी इंधनावर चालवल्या जातात. (Mahanagar Gas cng Station)

याशिवाय अनेक लोक आपल्या खाजगी गाड्यांमध्येही सीएनजी सिलिंडर बसवून घेतात. मारुती सुझुकी सारखी कंपनी सीएनजी सिलिंडर बसवूनही देते. कारण, स्वस्त इंधन पर्यायामुळे सीएनजीचा पर्याय अधिकाधिक लोक स्वीकारताना दिसत आहेत. भारतात महानगर गॅस ही कंपनी सीएनजी इंधनाचा पुरवठा करते. (Mahanagar Gas cng Station)

(हेही वाचा- Terrorists Attack in Pakistan : पाकिस्तान घाबरलं! दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये पोलिसांनाच दिल्या ‘या’ सूचना)

लोकांमध्ये सीएनजी इंधन लोकप्रिय होण्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत, 

  • पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त

  • किमतीत स्वस्त पण, पेट्रोलच्या तुलनेत इंधनाची सरासरी जास्त आहे

  • पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत हे जास्त पर्यावरण-पूरक इंधन आहे

  • सीएनजीमधून कार्बन उत्सर्जन कमी होतं

  • सीएनजी वजनाने हवेपेक्षा हलका वायू आहे. त्यामुळे वातावरणात सहज मिसळून जातो

  • खूप जवळ आग असेल तरंच सीएनजी पेट घेतो, त्यामुळे अपघाताची शक्यता कमी आहे

महानगर गॅसने मागच्या काही वर्षांत सीएनजीची लोकप्रियता लक्षात घेऊन सीएनजी पंपांची संख्याही वाढवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे हे इंधन आता सर्वत्र उपलब्ध आहे. पेट्रोलियम मंत्री एच एस पुरी यांनी २०२४ मध्ये भारतात ८,००० सीएनजी पंप उभारण्याची घोषणा केली आहे. (Mahanagar Gas cng Station)

(हेही वाचा- PM Modi in Mumbai: लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर; २९ हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन करणार)

या घडीला सर्वात जास्त सीएनजी पंप हे गुजरातमध्ये आहेत. तिथे ९७१ सीएनजी पंप आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये ६९८ पंप आहेत. महाराष्ट्राचा सीएनजी पंपाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ६३४ सीएनजी पंप आहेत. देशभरात मिळून सध्या ६,२०० सीएनजी पंप कार्यरत आहेत. आणि ही संख्या केंद्रसरकारला वाढवायची आहे. शहरांबरोबरच गावखेड्यातही सीएनजीचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Mahanagar Gas cng Station)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.