शीख संस्थानांचे Maharaja Ranjit Singh यांचा इतिहास

407
महाराजा रणजित सिंह (Maharaja Ranjit Singh) यांचा जन्म १३ नोव्हेंबर १७८० रोजी बद्रुखान किंवा गुजरांवाला येथे झाला. ते १८०१-१८३९ दरम्यान पंजाबच्या शीख राज्याचे संस्थापक आणि महाराजा होते. १७९७ मध्ये त्यांनी रावी नदी आणि चिनाब नदीच्या प्रदेशांचा कारभार सांभाळला होता. त्यांचे वडील महासिंग सुकार हे चकिया मिसलचे प्रमुख होते. जेव्हा रणजित सिंह फक्त १२ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या बालपणात त्यांना शीख मिसलांच्या एका लहान गटाचे नेते बनवले गेले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह ‘कन्हया मिसल’च्या सरदाराच्या मुलीशी झाला.
नक्काईसच्या मुलीशी दुसरे लग्न केल्याने रणजित सिंह (Maharaja Ranjit Singh) शीख संस्थानांमध्ये महत्त्वाचे ठरले. जिंदा राणी ही रणजित सिंह यांची पाचवी राणी आणि त्यांचा धाकटा मुलगा दलीप सिंगची आई होती. महाराजा रणजित सिंह यांना ‘शेर-ए-पंजाब’ म्हणून ओळखले जायचे. महाराजा रणजित सिंग यांनी पंजाबला एक मजबूत प्रांत म्हणून एकसंध ठेवलाच, पण आपल्या हयातीत इंग्रजांना आपल्या साम्राज्यापर्यंत पोहोचू दिले नाही.
१२ एप्रिल १८०१ रोजी रणजित सिंह (Maharaja Ranjit Singh) यांनी महाराजा ही पदवी धारण केली. गुरु नानकांच्या वंशजाने त्यांचा राज्याभिषेक केला. त्यांनी लाहोरला आपली राजधानी बनवली आणि १८०२ मध्ये अमृतसरकडे स्थलांतर केले. ब्रिटिश इतिहासकार जे. टी. व्हीलरच्या मते, “जर ते एक पिढी आधी जन्माला आले असते तर त्यांनी संपूर्ण भारत जिंकला असता.”
महाराजा रणजित सिंह (Maharaja Ranjit Singh) हे शिक्षित नव्हते, पण त्यांनी आपल्या राज्यात शिक्षण आणि कलेला खूप प्रोत्साहन दिले. त्यांनी पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था राखली आणि कोणालाही फाशीची शिक्षा दिली नाही. त्या काळी सतलुजच्या बाजूला असलेल्या लहान शीख संस्थानांमध्ये संघर्ष सुरू होता आणि त्यांच्यापैकी काहींनी रणजित सिंह यांना मदतीची विनंती केली. रणजित सिंह यांना या सर्व शीख संस्थानांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र करायचे होते. या कारणास्तव त्यांनी या भागात अनेक लष्करी मोहिमा केल्या आणि १८०७ मध्ये लुधियाना ताब्यात घेतले. सतलुजच्या पलीकडे असलेल्या काही छोट्या राज्यांमध्ये त्यांचा अशा प्रकारे सत्तेचा विस्तार ब्रिटिशांना आवडला नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.