इतिहास कट्ट्यातून उलगडला Maharani Tararani यांचा इतिहास

152
इतिहास कट्ट्यातून उलगडला Maharani Tararani यांचा इतिहास

छत्रपती शिवरायांची सून आणि छत्रपती राजारामांची पत्नी असलेल्या ताराराणींचा जीवन कर्तृत्व पट रविवार (२१ जुलै २०२४) रोजी इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांनी बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलातील ज्ञानविहार ग्रंथालय येथे उलगडला. ‘भारतीय इतिहास इतिहास संकलन समिती – कोकण प्रांत’ आणि ‘बोरीवली सांस्कृतिक केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दोन वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या ‘इतिहास कट्टा’ या उपक्रमात ‘गोष्ट ती ची’ या पर्वातील ‘रणरागिणी ताराराणी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रेक्षकांची विशेष उपस्थिती लाभली. (Maharani Tararani)

विलक्षण आत्मविश्वासाने भरलेली ही मराठ्यांची राणी, छत्रपती राजारामांनंतर तळपती तलवार घेऊन साऱ्या मराठी सरदारांबरोबर औरंगजेबाच्या समोर ही राणी शेवटपर्यंत ठाम उभी होती. औरंगजेब हरला, संपला, पण हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ताराराणीने जे कणखर नेतृत्व दिले, त्यामुळे शिवरायांचे राज्य जिंकण्याची त्याची राक्षसी इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. शिवरायांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य संपले तर नाहीच, उलट साम्राज्य रुपात भारतभर पसरले. ताराऊंनी मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील केलेल्या दैदिप्यमान कार्याचा वेध यशोधन जोशी यांनी घेतला. (Maharani Tararani)

(हेही वाचा – आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय नेत्यांऐवजी त्या त्या समाजातील नेत्यांशी चर्चा करा; Uddhav Thackeray यांचे आवाहन)

मराठेशाहीतील अनेक कर्तबगार व्यक्ती अल्पायुषी ठरल्या. मात्र सीताबाई उर्फ ताराराणी दीर्घायुषी ठरल्या. ताराराणींच्या १६७४ ते १७६१ ह्या प्रदीर्घ आयुष्यातील ऐतिहासिक घडामोडी सांगताना त्यांच्या जीवनातील अनेक चढउताराच्या प्रसंगांवर जोशी यांनी प्रकाश टाकला. छत्रपती शाहूंसोबतचा झगडा, कोल्हापूर गादीचे निर्माण, छत्रपती रामराजाचे प्रकरण, कोल्हापूरच्या वाड्यातील क्रांतीमधील अटक, पेशव्यांसोबत त्यांच्या बदलत्या भूमिका, अशा वादग्रस्त घटनांमुळे त्यांचे व्यक्तित्व वादळी ठरले तरीही त्यांचे ऐतिहासिक कर्तृत्व काळवंडले नाही असे ते म्हणाले. (Maharani Tararani)

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रविराज पराडकर यांचे उद्बोधक प्रास्ताविक झाले. ललित पवार यांनी यशोधन जोशी तसेच उपस्थितांचे आभार मानले. माजी नगरसेवक हरीशभाई छेडा तसेच बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे सुनील गणपुले, संजीव राणे यांसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. इतिहास कट्टा उपक्रमाचे प्रायोजक जनसेवा केंद्र बोरीवली व समाज माध्यम सहयोगी: व्हिजनरी स्टुडिओझ मीरा रोड यांनी देखील विशेष सहकार्य केले. (Maharani Tararani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.