Maharani Yesubai यांच्या चरित्राचा होणार उलगडा; प्रा. डॉ . रमिला गायकवाड सांगणार येसूबाईंची गोष्ट!

82
Maharani Yesubai यांच्या चरित्राचा होणार उलगडा; प्रा. डॉ . रमिला गायकवाड सांगणार येसूबाईंची गोष्ट!

श्रीसखी राज्ञी जयति हा उच्चार करताच, मराठ्यांच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाराणी येसूबाईंचे! शिवछत्रपतींची सून आणि शंभूछत्रपतींची पत्नी म्हणून भाग्यवंत ठरलेल्या येसूबाई (Maharani Yesubai) ह्यांचे संपूर्ण जीवनचरित्र संघर्षाने आणि चढउताराने भरून गेले आहे. शिवकाळाच्या इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये महाराणी येसूबाईंचे नाव जिजाऊसाहेबांइतकेच आदराने घेतले जाते, ते त्यांच्या संयमी, सहनशील आणि महापतिव्रती व्यक्तिमत्वामुळे! (Maharani Yesubai)

छत्रपती शंभूराजांवरील, सर्व संकटांच्या मालिकेत त्या पत्नी म्हणून खंबीरपणे अखंड साथ देत राहिल्या. औरंगजेबाने शंभूराजांना पकडून त्यांची क्रूर हत्या केली त्याही वेळी धीर न सांडता त्यांनी निर्मोही मनाने स्वराज्याच्या हितार्थ राजारामांचे मंचकारोहण केले. राजधानी रायगड शत्रुहाती पडल्यापासून सुमारे तीस वर्षे त्यांनी मुघलांच्या बंदिवासात काढली. संयम, धैर्य आणि त्याग यांची तेजोमूर्ती असलेल्या महाराणी येसूबाईंची गोष्ट इतिहास कट्ट्यावर सांगणार आहेत प्रा. डॉ. रमिला गायकवाड! (Maharani Yesubai)

(हेही वाचा – Nicolas Pooran : एका षटकांत ३६ धावा करत निकोलस पुरनची युवराजशी बरोबरी)

भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र आयोजित इतिहास कट्टामध्ये “गोष्ट ‘ती’ची, भाग पहिला – शिवकाळ”, गोष्ट तिसरी : श्रीसखी राज्ञी जयति – महाराणी येसूबाई या कार्यक्रमाचे आयोजन केले असून इतिहास अभ्यासक डॉ. रमिला गायकवाड श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. (Maharani Yesubai)

हा कार्यक्रम रविवार, दि. २३ जून २०२४, सकाळी ११ वा. रीवली सांस्कृतिक केंद्राचे ‘ज्ञानविहार ग्रंथालय’, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुल, सी विंग, तिसरा मजला, सोडावाला लेन, बोरीवली (प.), मुंबई येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक संख्येने इतिहासप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Maharani Yesubai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.