बुधवारपासून राज्यातील हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आज अधिवेशनाचा दुसरा आहे. विधीमंडळात यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजंगा पाहायला मिळाली. दरम्यान राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी विनामास्क असलेल्या मंत्र्यासह सर्वपक्षीय आमदारांना चांगलेच झापले. मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त करताना पवारांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे सांगितले.
We need to take things seriously. We don't want a lockdown again. We request everyone in the House also to please wear a mask. I request Opposition leaders to speak responsibly on this issue: Maharashtra Deputy CM Ajit Pawar on rising Omicron cases pic.twitter.com/dXtDsrNwpL
— ANI (@ANI) December 23, 2021
मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून संताप
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्व सदस्यांना मास्क वापराची विनंती करत ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. इतकेच नाही तर एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर आपलं बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा –भांडुप नवजात बालमृत्यू प्रकरण: सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी)
…गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक
पंतप्रधान हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्यासंदर्भातील बैठका घेत आहे. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तर येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community