RSS मुख्यालय परिसराची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला काश्मिरमधून अटक

109

नागपूर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणाऱ्या एका दहशतवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमधून रईस शेख याला अटक केली आहे. १५ जुलै २०२१ ला रईस शेखने नागपुरात रेकी केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटनं ताब्यात घेतले. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंटवर घेण्यात आला असल्याचेही सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुंबई पोलिसांचा आणखी एक ‘वाझे’! रेट कार्डसह तपशील आला समोर सम्पूर्ण बातमी वाचा❗)

काश्मिरला जाऊन घेतले ताब्यात 

गेल्या वर्षी जुलै महिन्यात रईस अहमद असादउल्ला शेखने डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती होती. त्यानंतर त्याला जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरला जाऊन त्याला ताब्यात घेतले असून सध्या दहशतवादी रईस शेखची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांकडून गोपनीय माहितीच्या आधारे अटक

समोर आलेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबून रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली. या ठिकाणांचा व्हिडीओ घेऊन त्याने तो त्याच्या हस्तकाला पाठवला. सप्टेंबर २०२१ मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.