देशाला पैसा पुरवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा, जीएसटी संकलनात टॉप-3 मध्ये हजेरी

116

राज्य सरकारकडून संकलित करण्यात येणा-या वस्तू व सेवा कर (जीएसटी)मध्ये महाराष्ट्राचा फार मोठा वाटा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्राने टॉप-3 राज्यांमध्ये हजेरी लावली आहे. ऑगस्ट 2021 च्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्रातील जीएसटी संकलनात 24 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मिळत आहे.

जीएसटी संकलनात वाढ

केंद्रीय अर्थमंत्रालयाने जीएसटी संकलनाबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार देशातील केरळ,कर्नाटक राज्यांसह महाराष्ट्र टॉप-3 राज्यांपैकी एक आहे. ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्रात जीएसटीद्वारे 15 हजार 175 कोटी रुपयांचा कर संकलित करण्यात आला होता, त्यामध्ये वाढ होऊन आता ऑगस्ट 2022 मध्ये जीएसटीद्वारे 18 हजार 863 कोटी रुपये कर संकलन झाले आहे.

कशी आहे राज्यांची आकडेवारी

गोव्यासारख्या छोट्याशा राज्याच्या जीएसटी संकलनामध्ये 32 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांचा जीएसटी वृद्धीदर मात्र मंद राहिला आहे. उत्तर प्रदेशच्या जीएसटी संकलनात 14, बिहार 23 आणि पश्चिम बंगालच्या जीएसटी संकलनात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र 24,केरळ 26 आणि कर्नाटकने 29 टक्के वाढ नोंदवली आहे.

जीएसटी संकलनात तेजी

मागील सहा महिन्यांत देशाला जीएसटीतून मिळणारा महसूल हा 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये जीएसटी संकलनाची वृद्धी ही 20 टक्क्यांच्या वर राहणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.