ट्रकच्या धडकेत लातूर-औरंगाबाद बसचा चक्काचूक, ६ जण ठार ८ गंभीर

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे बस अपघाताची घटना घडली. लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला. बस आणि ट्रक यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर एसटी बस आणि ट्रकचा भीषण हा अपघात झाला.

(हेही वाचा – जिम, ब्युटी पार्लरला जाताय? वाचा ठाकरे सरकारचा सुधारित आदेश)

यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात

रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. लातूर-औरंगाबाद ही बस लातूरच्या दिशेने निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या अपघाताची तीव्रता मोठी असल्याने सहा जणांना जागीच ठार झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here