भिवंडी शहरातील चव्हाण काॅलनी परिसरात एका मंगल कार्यालायची धोकादायक संरक्षक भिंत शेजा-याच्या घरावर कोसळल्याने 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत रस्त्यावर खेळत असलेल्या तीन चिमुरड्या मुलांसह दोन वृद्ध, एक तरुणी असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने पाडकाम सुरु असतानाच मंगळवारी ही घटना घडली.
तीन लहान मुलांसह दोन वृद्ध, एक तरुणी असे सहा जण गंभीर जखमी
अलीशा, नाझिया शेख, निजामुद्दी अन्सारी, फैजान, जैनाब अजहर खान आणि एक सत्तर वर्षांची वृद्ध महिला असे या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सहा जणांची नावे असून यांना सुरुवातीला शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र गंभीर दुखापत असल्याने, त्यांना ठाणे कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
( हेही वाचा: मद्य धोरण घोटाळ्यातील पहिल्या आरोपीला सीबीआयकडून अटक! )
काय घडले नेमके?
शहरातील चव्हण काॅलनी परिसरात गरीब नवाज हाॅल हे खुल्या मैदानातील मंगल कार्यालय होते. या मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत धोकादायक झाल्याने मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदाराकडून धोकादायक भिंत पाडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरु होते. यावेळी भिंत पलीकडे असेलल्या रहिवासी गल्लीतील रस्त्यावर कोसळली.
Join Our WhatsApp Community