HSC Exam: १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी, परीक्षेसाठी अर्ज भरताय?

111

राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) किंवा इयत्ता 12वी परीक्षा फॉर्म 2023 भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत बुधवार ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. तर विलंब शुल्कासह शुक्रवार २ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

(हेही वाचा – पोलीस भरतीचा घोळ सुरुच; फाॅर्म भरण्यापासून ते सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार अडचणीत)

याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना जारी केली आहे. त्यानुसार, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला आणि वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित विद्यार्थ्यांसह सर्व शाखांचे पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट विद्यार्थ्यांना नियमित शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे.

या सुचनेनुसार आणि सुधारित वेळापत्रकानुसार बुधवार 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहे. येत्या 2 दिवसांपर्यंत (शुक्रवार 2 डिसेंबरपर्यंत) विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदत असेल तर चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्ट जमा करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.