गेल्या आठवड्यातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्याचीही प्रतीक्षा संपली आहे. उद्या १७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी केली. हा निकाल दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये १,४४९,६६० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कुठे पाहता येणार निकाल? या आहेत लिंक…
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांना नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. मंडळाकडून २० जूनपर्यंत निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता १७ जूनला दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल.
Join Our WhatsApp Community