राज्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा, ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यात राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणा-या लाखो उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

( हेही वाचा: ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S लाॅंच, ‘ही’ आहेत वैशिष्ट्य )

…म्हणून 75 हजार नोकर भरती केली जाणार 

राज्य सरकारने नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केल्यानंतर आता आरोग्य विभागाकडूनदेखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मागील काळात सदोष भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यात परीक्षा घेणा-या यंत्रणेकडूनदेखील मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here