भारताच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील एका चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शाळेच्या पटांगणात अगदी निरागस भावनेने मुलाने केलेले हे भाषण अनेकांना भावले. त्याच्या भाषणाची दखल सर्वसामान्यांनीच नव्हे तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. एकनाथ शिंदे यांनी चिमुरडा कार्तिक वजीर याची भेट घेतली आहे. ट्वीट करत त्यांनीच याची माहिती दिली आहे.
प्रजासत्ताकदिनी #लोकशाही या विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याची आज वाटूर येथे भेट घेतली. pic.twitter.com/Q8bWVgBEkx
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 2, 2023
ट्वीटमध्ये काय म्हटले?
प्रजासत्ताकदिनी लोकशाही या विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याची आज वाटूर येथे भेट घेतली. याप्रसंगी कार्तिक याच्या लोकशाही विषयावरील भाषणाकरिता अभिनंदन करित त्याचे मनापासून कौतुक केले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
(हेही वाचा ५ फेब्रुवारीच्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; शुक्रवारी निर्णय)
उपचाराची घेतली जबाबदारी
एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्तिकच्या उपचारासाठी आदेश दिला आहे. भेटीमध्ये कार्तिकला दूरदृष्टीचा दोष आहे असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आल्याचे यासमयी जाहीर केले, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
Join Our WhatsApp Community