- नमिता वाराणकर
‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी राजभाषा दिन’ हे दोन्हीही दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात. यागची कारणेही वेगळी आहेत. अनेक जण या दिवसांमध्ये गल्लत करतात; कारण त्यांना ‘मराठी राजभाषा दिन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिन’ याविषयी माहिती असतेच, असे नाही. त्यामुळे हे दोन्ही दिवस केव्हापासून साजरे होऊ लागले आणि त्यामागची कारणे काय आहेत, याचा केलेला हा उहापोह –
मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली तो दिवस म्हणजे १ मे १९६०. या दिवसापासून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाले. तेव्हापासून, १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. दरवर्षी १ मे या एकाच दिवशी मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनही साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेला आहे, तर १ मे महाराष्ट्र दिनाबरोबरच ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. (Maharashtra Day 2024)
१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; परंतु राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता नव्हती. ही खंत वसंतराव नाईकांना होती. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारनं ‘मराठी राजभाषा अधिनियम १९६४’ सर्वप्रथम आणून ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे वसंतराव नाईक सरकारने १ मे रोजी अधिकृतपणे जाहीर केले. १९६६पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर ४ केंद्राची स्थापना केली आणि राज्य कारभार मराठीतून चालणार, असे अधिकृतपणे जाहीर केले. (Maharashtra Day 2024)
(हेही वाचा – Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका)
मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस भिन्न आहेत. मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रतिभावंत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून २०१३ पासून साजरा केला जातो. ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे केले जाते. (Maharashtra Day 2024)
वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतनिर्मितीपूर्वी मध्य प्रदेशने भाषाविषयक धोरणात आघाडी घेतली. या राज्याने राजभाषा म्हणून हिंदीबरोबर मराठीचाही सन्मान केला. १९५३ पासून पुढे तीन वर्षे किंवा अधिक काळ मराठी ही राजभाषा म्हणून मध्य प्रदेशात प्रचलित होती. राज्यघटनेत अनुच्छेद ३४७नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. (Maharashtra Day 2024)
राजभाषा परिचय पुस्तक
१ मे १९६०ला महाराष्ट्राची स्थापना झाली. ‘राजभाषा मराठी’चा शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६०च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे घोषित झाले. त्यानुसार सन १९६५चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ राजपत्रात घोषित करण्यात आला. १ मे १९६६ पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजात मराठी राजभाषा अधिनियम लागू करण्यात आले. अमराठी अधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. (Maharashtra Day 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community