येत्या १मे रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या चळवळीत अनेक गोष्टी घडल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी हा लढा लढला गेला. ‘मुंबईसह महाराष्ट्र’ (Maharashtra Day) झालाच पाहिजे असे नारे सुरु झाले. अखेर १ मे १९६० रोजी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र ही मोहीम फत्ते झाली. तेव्हापासून आपण १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी पार्कवर होणार ‘परेड’
महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नागरिक मोठ्या उत्साहात यावेळी वेगवेगळ्या (Maharashtra Day) कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. अशातच यावर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे परेड आयोजित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर १ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण क्रिया होणार नाहीत, असा आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त यांनी दिले आहेत.
गैरप्रकार घडू नये याकरिता…
या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून कुठलाही गैरप्रकार घडू नये याकरिता या आदेश देण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी (Maharashtra Day) रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा …तर राष्ट्रवादीचा विरोध नाही; बारसू रिफायनरीसंदर्भात अजित पवारांची भूमिका स्पष्ट)
Join Our WhatsApp Community