राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादनं केलं.
(हेही वाचा – Labor Day : कामगार अस्तित्वाच्या लढाईसाठी सज्ज व्हा)
पत्रकारांशी संवाद. https://t.co/6qVnFf49wv
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 1, 2023
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चळवळीत अनेक गोष्टी घडल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी हा लढा लढला गेला. ‘मुंबईसह महाराष्ट्र’ (Maharashtra Day) झालाच पाहिजे असे नारे सुरु झाले. अखेर १ मे १९६० रोजी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र ही मोहीम फत्ते झाली. तेव्हापासून आपण १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो.
हेही पहा –
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री सकाळी हुतात्मा चौकात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra Day) लढयातील हुतात्मांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community