महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राज्य कला प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती पुढील आठ दिवसांत घेऊन न गेल्यास संबंधित कलाकारांचा या कलाकृतींवरील हक्क संपुष्टात येणार आहे.
दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते
राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. त्यासाठी इच्छुक कलाकारांकडून कलाकृती मागविण्यात येतात. प्रदर्शन संपल्यावर कलाकृती घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित कलाकाराची असते. मात्र, अनेक कलाकार आपली कलाकृती नेत नसल्याचे निदर्शनात आले आहे. संबंधित कलाकारांनी या कलाकृती पुढील आठ दिवसांत घेऊन न गेल्यास त्यांचा कलाकृतींवरील हक्क संपुष्टात येणार आहे. या कलाकृतींच्या निर्लेखनाबाबत कला संचालनालयाच्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
(हेही वाचा सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे नाट्यरुपांतर करुन केला जाणार तपास)
Join Our WhatsApp Community