… तर किराणा दुकानातही मिळणार वाईन!

119

जर तुम्ही बेकरी, किराणा दुकानात दैनंदिन सामान, किंवा धान्य आणण्यास गेलात आणि तिथेच तुम्हाला वाईनच्या बॉटल दिसल्या तर नवल वाटून घेऊ नका… दैनंदिन गरजेची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी करू शकते. त्यामुळे आता लवकरच बेकरी, किराणा दुकानात वाईनची विक्री होताना तुम्हाला दिसू शकते.

तसेच, सरकारकडून १ लीटरमागे १० रुपये अबकारी कर आकारण्यात येणार असल्याने वाईन आणखी महाग होणार आहे. दरम्यान, मंगळवारी नाममात्र अबकारी कर म्हणून वाईनवर प्रति लीटर १० रूपयांची वाढ जाहीर केली आहे. दैनंदिन गरजांची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बॉटल विक्री करण्यात येण्याचे कारण म्हणजे बहुतेक वाईनमध्ये इतर मद्यांच्या तुलनेत अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. असेही सांगितले जात आहे की, किराणा दुकान आणि बेकरीमध्ये वाईनची विक्री केल्यावर राज्यात किती खपत होते याबाबतची माहिती मिळणार आहे.

(हेही वाचा –अरेरे…थर्टी फस्ट घरातच साजरा करावा लागणार!)

तसेच, मोठ्या संख्येने रेस्टॉरंट आणि बेकरी स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी वाइन वापरतात. राज्यात २००० सालापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही कर वाढविण्यात आला नव्हता. तर त्यापूर्वी कर खूपच कमी होता. नवीन कर लागू केल्याने राज्याला केवळ ५ कोटी रुपयांचा महसूल मिळणार असला तरी, उत्पादन शुल्क प्रशासनाला बाजारात विकल्या जाणार्‍या वाईनच्या बाटल्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे मुख्य उत्पादन शुल्क सचिव वल्सा नायर सिंह यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.