एसटीचे अजूनही ३७ आगार बंदच! किती कंत्राटी कामगारांना केले नियुक्त? वाचा…

राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांना कामावर हजर राहण्याचे आवाहन सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांनी केले, त्याआधी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. तरीही एकही संपकरी कामगार कामावर रुजू झाला नाही. अजूनही राज्यातील ३७ आगार हे पूर्णतः बंद आहेत.

२६ हजार कामगार कामावर रुजू

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी सुरु केलेला संप मागील अडीच महिने सुरु आहे, आजवर ८७ हजार कर्मचारी कार्यरत होते, त्यातील २६ हजार ५०० कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत. तर ५ हजार कर्मचाऱ्यांची सेवा बडतर्फ केली आहे. महामंडळाने बडतर्फीची कारवाई सुरूच ठेवली आहे.

(हेही वाचा एसटीच्या संपावर शोधला रामबाण उपाय! जाणून घ्या कोणता?)

कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरु

संपकरी कामगारांना सेवेत येण्यासाठी ३ वेळा नोटीस दिली होती, तरीही ते कामावर रुजू झाले नाहीत. जरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत असली तरी जे कामगार कामावर रुजू होतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे महामंडळाच्या व्यवस्थापक शेखर चेन्ने यांनी स्पष्ट केले आहे. तशी माहिती पत्रके सर्व आगारात लावली आहेत. मात्र संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी कंत्राटी कर्मचारी भरत असल्याचे शेखर चेन्ने म्हणाले. जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, पण ज्यांचे वय 62 वर्षांच्या खाली आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही महामंडळ पुन्हा सेवेत रुजू करून घेत आहेत. असा प्रकारे कंत्राटी आणि सेवानिवृत्त कर्मचारी मिळून आता पर्यंत अडीच हजार कामगारांची भरती केली आहे, असेही शेखर चेन्ने म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here