वीर सावरकरांच्या अभिनव भारत मंदिरासाठी ५ कोटींची तरतूद!

162

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यातून प्रत्येक येणारी पिढी प्रेरणा घेते अशा तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिराचे अत्याधुनिकरण होणार आहे. कारण यासाठी अभिनव भारत केंद्राच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने पाच कोटी रूपयांच्या निधी मंजूर केला आहे. विनायक आणि बाबाराव सावरकर १८९८ च्या सुमारास तीळभांडेश्वर लेनमधील वर्तकांच्या वाड्यात रहायला आले. १९०४ मध्ये मित्रमेळाचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे झाले. अभिनव भारताची मूळ प्रतिज्ञा भारतावरील ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याची होती.

स्वातंत्र्य चळवळीचे होणार ‘जतन’

वीर सावरकर यांनी अभिनव भारत संस्थेची स्थापना करून स्वातंत्र्य लढा तीव्र केला होता. इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य लढा कसा सुरू ठेवायचा, तो अधिकाधिक तीव्र कसा करायचा याची रणनीती याच अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयात आखली जायची. देशभरातील अनेक क्रांतीकारक याच ठिकाणी येवून वीर सावरकरांची भेट घ्यायचे. यामुळे या निवास मंदिराला अनन्य साधारण असे ऐतिहासिक महत्व आहे. या निवासस्थानाला अभिनव भारत मंदिर असे नाव दिलेले आहे. परंतु अभिनव भारत मंदिराचा वाडा हा मोडकळीस आलेला असल्याने त्यांतील वस्तू, विविध छायाचित्रे तसेच वीर सावरकर यांनी वापरलेल्या वस्तू यांचे जतन करणे अवघड होत होते. आता राज्य सरकारने या ठिकाणाच्या विकासासाठी ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे.

(हेही वाचा तर 2040 मध्ये भारताचा पंतप्रधान मुसलमान असेल! रणजित सावरकरांनी दिला धोक्याचा इशारा)

काय होणार बदल?

या निधीतून अभिनव भारत मंदिरामध्ये स्वातंत्र्य चळवळी विषयीचे ठळक मुद्दे, अद्ययावत आणि परिपूर्ण ग्रंथालय, वीर सावरकर यांचा आधुनिक विचार आणि विज्ञानदृष्टी याविषयीचे विशेष संग्रहालय, सन १८५७ ते १९४७ या दरम्यानच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे फोटो, तसेच त्यांच्या विषयीच्या डिजीटल माहितीचे दालन, वीर सावरकर यांचे डिजीटल स्वरूपाचे समग्र साहित्य हॉल, मराठी शब्दकोश, स्वातंत्र्य चळवळी विषयीच्या फोटोंची गॅलरी, वीर सावरकरांचे विविध फोटो आणि पुस्तक सामुग्रीचे प्रदर्शन हॉल उभारण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.