‘हिंदुस्थान पोस्ट’चे अंशकालीन वार्ताहर दीपक कैतके यांची महाराष्ट्र शासनाच्या ‘ब’ विभागीय अधिस्वीकृती समितीवर निवड करण्यात आली आहे. मुंबई विभागातील समितीत त्यांच्यासह ४ सदस्य कार्यरत राहतील.
प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्यात आली आहे. त्यातील मुंबई विभागीय समितीवर कैतके यांची निवड करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ जुलै रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या समितीतील सदस्यांच्या नियुक्तीची मुदत ३ वर्षे इतकी राहणार आहे.
‘ब’ विभागीय अधिस्वीकृती समिती (मुंबई)
- १) मराठी पत्रकार परिषद – दीपक कैतके
- २) महाराष्ट्र संपादक परिषद – विभव बिरवटकर
- ३) इलेक्ट्रॉनिक माध्यम – राजू सोनावणे
- ४) स्थानिक संघटना – चंदन शिरवाळे
- ५) शासन नामनिर्देशित सदस्य – विनया देशपांडे