६०८ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; सरपंच पदासाठीही थेट निवडणूक

114

राज्यभरातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या ‘या’ FREE सेवांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या!)

सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदान यांनी दिली.

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार, संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २४ ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येतील. २ सप्टेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असेही सांगण्यात आले.

…असे होईल मतदान

१८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १९ सप्टेंबरला होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.

जिल्हानिहाय ग्रामपंचायती

– नंदुरबार : शहादा- ७४, नंदुरबार- ७५.
– धुळे : शिरपूर- ३३.
– जळगाव : चोपडा- ११ व यावल- २.
– बुलढाणा : जळगाव (जामोद)- १, संग्रामपूर- १, नांदुरा- १, चिखली- ३ व लोणार- २.
– अकोला: अकोट- ७ व बाळापूर- १.
– वाशीम: कारंजा- ४.
– अमरावती: धारणी- १, तिवसा- ४, अमरावती- १ व चांदुर रेल्वे- १.
– यवतमाळ: बाभुळगाव- २, कळंब- २, यवतमाळ- ३, महागाव- १, आर्णी- ४, घाटंजी- ६, केळापूर- २५, राळेगाव- ११, मोरगाव- ११ व झरी जामणी- ८.
– नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- १, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)- ४, लोहा- ५, कंधार- ४, मुखेड- ५, व देगलूर- १.
– हिंगोली: (औंढा नागनाथ)- ६. परभणी: जिंतूर- १ व पालम- ४.
– नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक- १७.
– पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ५ व भोर- २.
– अहमदनगर: अकोले- ४५.
– लातूर: अहमदपूर- १.
– सातारा: वाई- १ व सातारा- ८.
– कोल्हापूर: कागल- १

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.