कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला विरोध केल्याच्या निषेधार्थ समितीने ‘आता चलो कोल्हापूर’ची हाक दिली आहे. सोमवार 26 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात होणा-या कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आणि दडपशाहीच्या माध्यमातून म.ए समितीने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली. त्याचा निषेध म्हणून आता समितीच्यावतीने कोल्हापूरात आंदोलन करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: ‘सँडल’ वरून खुनाची उकल, जिम ट्रेनरला अटक )
…म्हणून कोल्हापूरात करणार आंदोलन
या आंदोलनासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून कोल्हापूरला येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. बेळगावात आंदोलन केले तर कर्नाटकी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार. यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला जाऊन आंदोलन करावे, अशी इच्छा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
Join Our WhatsApp Community