महाराष्ट्रात मुंबईपासून कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली होती. आता परिस्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परिस्थिती अशीच सामान्य राहिली तर महिना अखेरीस महाराष्ट्र अनलॉक होऊ शकतो, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र पूर्णत: अनलॅाक होण्याची शक्यता
कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असले तरी मास्क मुक्ती मात्र होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले. पण सर्वप्रथम मुंबईतच रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. टप्याटप्याने राज्याच्या इतरही भागांतही निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णत: अनलॅाक होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे.
(हेही वाचा- पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील ‘त्या’ चहावाल्याला! सोमय्यांचा खळबळजनक दावा)
मास्क मुक्त महाराष्ट्र होणार नाही!
नागपूरात मात्र आठवडाभरासाठी निर्बंध तसेच राहणार आहेत. अनलॅाक होत असताना मास्क मुक्त महाराष्ट्र होणार नाही. अनलॅाकिंग करताना चौथ्या लाटेचीही चिंता आहे. चौथी लाट ओमीक्रॅानपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याची माहिती आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान विधिमंडळ समिती नागपुरात येऊन गेली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यावे की नाही, याबद्दल समितीचा निर्णय झालेला नाही. येत्या 15 फेब्रुवारी रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले
Join Our WhatsApp Community