जालना जिल्ह्यात चांदई गावांमध्ये गुरुवारी झालेल्या दगडफेकीनंतर या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यता आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या तीन प्रकरणांत 250 जणांवर गुन्हे दाखल केले असून, सरपंचासह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या दगडफेकीनंतर, पाच ते सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. तर सात शासकीय वाहनांची जमावाने तोडफोट केली होती.
सरपंच आणि उपसरपंचांना अटक
जालना जिल्ह्यातील चांदई गावात गुरुवारी दोन गटांत तुफान दगडफेक करण्यात आली होती. गावातील कमानीला नाव देण्यावरुन हा वाद पेटला. जमावाला पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना हवेत गोळीबार करण्यात आला. दोन्ही गटाकडून आलेल्या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह, अग्नीशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच आणि उपसरपंचासह 18 जणांना अटक केली आहे.
( हेही वाचा: बाॅम्बसदृश्य वस्तू नाही, तर मग स्फोट कशाचा? पुणे रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या वस्तूबाबत संभ्रम कायम )
सध्या परिस्थिती नियंत्रणात
चांदई गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरुन दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान, गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी अनधिकृतपणे उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला असून ती कमानदेखील काढण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी प्रभारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. गावात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community