महाराष्ट्र – कर्नाटक प्रश्न अधिक तापणार; कर्नाटकची नवी कुरापत, ‘या’ तालुक्यावर केला दावा

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारक़डून नवी कुरापत सुरु आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

( हेही वाचा: एकविरा आईच्या दारी, हलाल मांसाची विक्री )

जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा तयार

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक सरकार दावा सांगण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती खु्द्द कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देईल तसेच शेजारील राज्यातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शनही देण्यात येईल, असेही बोम्मई यांनी सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी कायमच पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. त्यामुळे तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केला आहे. दरम्यान, जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा आम्ही तयार केला असल्याची माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here